Relationship : वारंवार पार्टनरला मॅसेज केल्यास नात्यात येईल दुरावा; चुकूनही 'या' चुका करू नका

Messaging Problem In Relationship : नकळत आपण समोरच्या व्यक्तीची काळजी व्यक्त करत त्यांना सतत मॅसेज करतो. मात्र असे केल्याने नात्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
Relationship
RelationshipSaam TV

एखादं जोडपं जेव्हा प्रेमात पडणार असतं तेव्हा सुरूवातीला ते दोघे एकमेकांना डेट करतात. बाहेर कॉफी किंवा मुव्हीला जाऊन एकमेकांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. डेटींगमध्ये समोरची व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसते. मात्र सुरुवातीला एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा आणि एकमेंकांना वेळ देण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. अशात नकळत आपण समोरच्या व्यक्तीची काळजी व्यक्त करत त्यांना सतत मॅसेज करतो. मात्र असे केल्याने नात्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

Relationship
Relationship : सोशल मीडियाच्या 'या' चुका करण्यापासून राहा दूर; नाहीतर रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो 'दुरावा'

रिलेशनमध्ये येण्याआधी डेट करत असताना आपाल पार्टनर काय करत आहे? तो सध्या कुठे असेल? त्याने मला मॅसेज नाही केला, रिप्लाय नाही केला, असे विविध विचार आपल्या मनात येत असतात. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला सतत मॅसेज करत असतो. अशात अचानक त्या व्यक्तीचे मॅसेजला रिप्लाय येणे बंद झाल्यास आपल्याला त्रास होतो. त्यामुळे मॅसेजमुळे आपल्या नात्यावर होणाऱ्या वाईट परिणामांची माहिती जाणून घेऊ.

वारंवार मॅसेज करण्याचे नुकसान

वारंवार तुम्हाला तुमच्या पार्टनरला मॅसेज करावा वाटत असेल तर ते आताच थांबवा. कारण तुम्ही त्यांना नियंत्रीत करत आहात असा तुमच्या पार्टनरचा समज होऊ शकतो. एखादी परिस्थिती तुमच्या मनानुसार असावी असा विचार करणे देखील बंद करा.

तुम्हाला तुमच्या पार्टनरची फार आठवण येत असेल तर एकत्र घालवलेले क्षण आठवा. त्याला किंवा तिला सतत मॅसेज करू नका. यामुळे तुमचा पार्टनर इरिटेड होण्याची शक्यता असते. त्यामुळे नात्यात प्रेम आणि आठवणींना बॅलेन्स करता येणे गरजेचे आहे.

सतत मॅसेज केल्यानंतर पार्टनर काही कामात असेल तर त्याला रिप्लाय देता येत नाही. किंवा कॉलवर देखील बोलता येत नाही. अशावेळी आपल्या मनात १०० विचार येऊन जातात. त्यामुळे असे विचार करणे थांबवा. तसेच प्रत्येकाला आपला वेळ द्या.

तुमच्या पार्टनरचे रोजचे शेड्यूल काय आहे ते जाणून घ्या. त्यानंतरच त्याला मॅसेज किंवा कॉल करा. कारण तुम्ही कामात असताना तुम्हाला सतत कोणी मॅसेज कॉल केला तर तुमचीही चिडचिड होते. त्यामुळे आपल्यावरून दुसऱ्याच्या समस्या ओळखणे शिका.

तुम्हाला तुमच्या पार्टनरकडे काही महत्वाचे काम असेल तर त्याला १० मॅसेज करत बसू नका. त्याऐवजी एखादा कॉल करा. महत्वाचं काम असल्यानेच कॉल येत आहे असं समजून समोरची व्यक्ती तुमचा कॉल लगेचच रिसिव्ह करेल.

Relationship
Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com