Relationship : सोशल मीडियाच्या 'या' चुका करण्यापासून राहा दूर; नाहीतर रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो 'दुरावा'

Social Media and Unhealthy Relationship: आजकालच्या युगात सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही देखील सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करत असाल तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या रिलेशनशीपवर होतात.
Social Media
Social MediaCanva

इंटरनेटच्या युगात मित्र, कुटुंब यांच्याशी जोडलेले राहाण्यासाठी सोशल मीडिया एक उत्तम साधन आहे. अशाकाळात तुमचे रिलेशनशिप हेल्थी ठेवणे खुप आव्हानात्मक असते. आपल्या कडून काही अशा चुका घडतात ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा, जोडीदारासोबत भांडणं होतात . या सगळ्याचा पती पत्नीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. आज आपण जाणून घेऊया सोशल मीडिया संबंधीत काही अशा चुका ज्यामुळे तुमची हेल्दी रिलेशनशिप कमकुवत होऊ शकते.

Social Media
Relationship Tips: मुलांच्या 'या' स्वभावावर मुली भाळतात

आपण जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन घालवतो, त्यामुळे आपल्या जोडीदाराला वेळ देता येत नाही आणि दोघांमध्ये फारसा संवाद होत नाही. जोडीदाराशी संवाद होत नसल्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या जोडीदाराला वेळ द्या. यामुळे तुमच्या नाते अजून घट्ट होणार आणि तुमची एकमेकांबद्दलची मते तुम्हाला मांडता येतील. सोशल मीडियावर अतर लोकांना पाहून तुमच्या नात्याची तुलना करणे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्हाला जे सोशल मीडियावर दिसते तसं वास्तविक आयुष्यामध्ये घडत नाही. या सर्व गोष्टींची तुमच्या स्वता:च्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा तुमचे नाते अजून चांगले कसे होईल या कडे लक्ष द्या.

तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता. परंतु, वैयक्तिक आयुष्यातील समस्यांची सोशल मीडियावर चर्चा करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यापेक्षा जर समस्या बोलून सोडवण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारासोबत झालेले वैयक्तिक वाद तुम्ही सोशल मीडियावर स्टोरी ,स्टॅटस आणि पोस्टच्या माध्यमातून शेअर करता. यामुळे सर्वाना तुमच्या नात्यामधील वाद कळतो यामुळे तुमच्या नात्यामध्ये भांडणं वाढून तुमच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचे वाद जोडीदारासोबत संवाद करून सोडवा.

Social Media
Relationship Tips: लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसं जपाल जोडीदाराला? 'या' टीप्स करा फॉलो

तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि ऑनलाईन फ्लर्टिंग करत असाल तर, त्याचा तुमच्या नात्यावर गंभीर परिणम होऊ शकतो. या सर्व घटनेमुळे तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो आणि जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल दुरावा निर्माण होत असतो. नात्यांमध्ये विश्वासघात होईल अशी काही कृती करू नका. नात्यामध्ये एकमेकांच्या डिजिटल स्पेसचा आदर करणे महत्त्वाचे आहे.

Social Media
Blood Sugar Level : उन्हाळ्यात डायबिटीज वाढतोय? आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा, साखर नियंत्रीत राहिल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com