Sadhguru Thoughts : वडिल-मुलामध्ये सतत मतभेद, भांडणं होण्याची कारणं काय? सद्गुरूंनी सांगितला दोघांच्या मैत्रीवरचा उपाय

Father Son Relationship Tips : खर तर नात्यांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, मुली वडिलांच्या असतात आणि मुलं आईची असतात. एक वेळ अशी येते की मुलगा मोठा होतो आणि तो त्याच्या आवडीनिवडी आणि विचार व्यक्त करू लागतो.
Motivation Tips
Motivation TipsSaam Tv
Published On

Relatioship Tips :

खर तर नात्यांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, मुली वडिलांच्या असतात आणि मुलं आईची असतात. एक वेळ अशी येते की मुलगा मोठा होतो आणि तो त्याच्या आवडीनिवडी आणि विचार (Thoughts) व्यक्त करू लागतो.

अशा परिस्थितीत कधी कधी वडील आणि मुलामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात, कारण जुन्या पिढीची विचारसरणी आणि आधुनिक युगाची विचारसरणी एकमेकांना भिडते. त्यांच्या वागण्याबोलण्यातही फरक जाणवतो, त्यामुळे वडील (Father) आणि मुलाच्या नात्यात अनेकदा वाद होतात. अशा परिस्थितीत हे कसे टाळता येईल? त्यासाठी प्रेरक वक्ते सद्गुरूंनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

अलीकडेच एका शो दरम्यान बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने सद्गुरूंना विचारले की, एका विशिष्ट वयानंतर वडील आणि मुलामध्ये तणाव का निर्माण होतो आणि त्यांच्यातील अंतराचे कारण काय आहे? यावर सद्गुरू म्हणाले की, ही बाब वडील-मुलांच्या नात्याची नसून एकाच घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची आहे.

Motivation Tips
Motivational Quotes : प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात, यश नक्कीच मिळेल...

एकाच घरात दोन माणसे राहतात तेव्हा त्यांच्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे. हे मान्य करायला हवे. एवढेच नाही तर सद्गुरुंनी असेही सांगितले की, दोन पुरुषांच्या भांडणात आईचे हाल होतात, कारण ही स्त्री एकाची पत्नी असते आणि दुसऱ्याची आई असते. हे सर्व दोन व्यक्तींमध्ये होणे स्वाभाविक आहे.

सद्गुरू म्हणाले की, मुलगा 9-10 वर्षांचा असतो तेव्हा त्याच्यासाठी त्याचे वडील देवापेक्षा कमी नसतात, कारण ते आपल्या मुलाची प्रत्येक गरज पूर्ण करतात आणि त्याची काळजी घेतात. पण जेव्हा मूल 15-16 वर्षांचे असते, तेव्हा समस्या सुरू होतात, कारण या वयात मुले स्वतःची विचारसरणी आणि जीवनशैली बनवू लागतात आणि त्यांना इतरांच्या कल्पना स्वीकारणे कठीण जाते.

Motivation Tips
Motivational Thoughts | गौर गोपाल दासांचे हे विचार लक्षात ठेवा! राहाल सकारात्मक

त्यामुळे मुलगा मोठा झाला की, घरातील दोन पुरुषांमध्ये वाद होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे, दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्यावा आणि त्यानुसार घरगुती निर्णय घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com