Samsung 5G Phone Google
लाईफस्टाईल

Samsung 5G Phone: सॅमसंगचा मोठा धमाका! Galaxy A07 5Gमध्ये दमदार कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung Galaxy A07 Launch Date: सॅमसंग Galaxy A07 5G स्मार्टफोन भारतात लवकर लॉन्च होणार असून दमदार कॅमेरा मोठी बॅटरी स्मूथ डिस्प्ले आणि परवडणारी किंमत यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

येत्या फेब्रुवारीत तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खास बातमी तुमच्याचसाठी आहे. भारतामधले आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग लवकरच आपला नवा स्मार्टफोन Galaxy A07 5G भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा स्मार्टफोन बाजारात आणण्याची शक्यता आहे.

डिजिटल मनोरंजन, सोशल मीडिया वापर आणि दिवसभर टिकणारी बॅटरी हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन खास डिझाइन करण्यात आला आहे. परवडणाऱ्या किमतीत दमदार फीचर्स देण्यावर सॅमसंगचा भर आहे. Galaxy A07 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य ऑटोफोकस कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आहे.

F1.8 अपर्चरमुळे पोर्ट्रेट फोटोमध्ये आकर्षक बोकेह इफेक्ट मिळतो. सूर्यास्त, रस्त्यावरील दृश्ये आणि खास क्षण टिपण्यासाठी हा कॅमेरा उपयुक्त ठरणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया स्क्रोलिंग आणि वेब ब्राउझिंग अधिक स्मूथ होते. हाय ब्राइटनेस मोडमुळे डिस्प्ले 800 निट्सपर्यंत उजळ दिसतो. स्क्रीन सुरक्षिततेसाठी टेम्पर्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

Galaxy A07 5G ची आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची 6000mAh बॅटरी. ही बॅटरी मागील मॉडेलच्या तुलनेत 20 टक्के जास्त क्षमतेची आहे. यासोबत 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून एकदा चार्ज केल्यावर फोन दिवसभर सहज वापरता येतो. Galaxy A07 5G ची किंमत, अचूक लॉन्च तारीख आणि ऑफर्स याबाबतची माहिती सॅमसंग लवकरच जाहीर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PT Usha Husband Death: पी.टी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन

Shani Vakri 2026: 30 वर्षांनंतर शनी चालणार वक्री चाल; या राशींना मिळणार लाभाची संधी

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Virat Kohli: इंस्टावर कोहलीचं कमबॅक! का डिएक्टिव झालेलं विराटचं अकाऊंट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT