Ajit Pawar Death: राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Governor And CM Condole Ajit Pawar Family: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
Governor And CM Condole Ajit Pawar Family
Ajit Pawar DeathGOOGLE
Published on
Ajit Pawar Death
Ajit Pawar Death

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले.

Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawar

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

CM Devendra Fadnavis
Governor condolence

मान्यवरांनी त्यावेळी अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना कणखर व निर्णयक्षम नेतृत्व म्हणून गौरविले.

Ajit Pawar condition after crash
Ajit Pawar plane crash update

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राजकीय योगदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण करत राज्यासाठी त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील, असे नमूद केले.

Ajit Pawar condition after crash
Ajit Pawar plane crash updatesaam tv

तिथे केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही अंत्यदर्शनासाठी आहेत.

Ajit Pawar condition after crash
Ajit Pawar plane crash updatesaam tv

अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, तसेच ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यावेळी उपस्थित होते. मोठ्या संख्येने राजकीय नेते, अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी येत करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com