Motorola Signature: प्रत्येक फोटो होईल तुमची Signature; जबरदस्त कॅमेऱ्यासह Motorola Signature लॉन्च, वाचा संपूर्ण माहिती

Motorola New Smartphone Launch: Motorola Signature हा अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. DXOMARK गोल्ड कॅमेरा, 8K व्हिडिओ, AI फीचर्स आणि लक्झरी डिझाइनसह हा फोन Rs. 54,999 पासून उपलब्ध आहे.
Motorola Signature
Motorola Signature New Smartphone Launchgoogle
Published On

मुंबई, २३ जानेवारी २०२६: मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीचा एआय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या मोटोरोला कंपनीने आज भारतात आपला अल्ट्रा-प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Signature अधिकृतपणे लाँच केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, लक्झरी डिझाइन आणि वैयक्तिकृत प्रीमियम अनुभव यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात नवे मापदंड निर्माण करेल, असा दावा कंपनीने केला आहे. तडजोड न करणाऱ्या उत्कृष्टतेचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेला Motorola Signature कॅमेरा, परफॉर्मन्स आणि लाइफस्टाइल अनुभवाच्या बाबतीत वेगळा ठरतो.

Motorola Signature
Jio Recharge Plan: धमाल! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दिवसाला फक्त ५ रुपयांचा खर्च; वाचा संपूर्ण माहिती

Motorola Signature मध्ये जगातील एकमेव ट्रिपल Sony LYTIA™ प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टीम देण्यात आली असून DXOMARK कडून गोल्ड लेबल सर्टिफिकेशन मिळवणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. १६४ DXOMARK कॅमेरा स्कोअरमुळे INR १ लाखांखालील श्रेणीत हा देशातील नंबर वन कॅमेरा फोन ठरला आहे.

यामध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रगत Sony LYTIA™ B2B मेन कॅमेरा असून तो Dolby Vision सह 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय ३x ऑप्टिकल झूम आणि १००x सुपर झूम प्रो असलेला पेरिस्कोप कॅमेरा, अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो कॅमेरा तसेच ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Pantone™ व्हॅलिडेटेड रंग अचूकतेमुळे फोटोज आणि व्हिडिओ अधिक नैसर्गिक आणि प्रोफेशनल दर्जाचे दिसतात.

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला असून तो प्रगत एआय क्षमतांसह येतो. १६GB पर्यंत LPDDR5X रॅम, १TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज आणि अत्याधुनिक कूलिंग सिस्टीममुळे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि कंटेंट क्रिएशन दरम्यान सातत्यपूर्ण उच्च कार्यक्षमता मिळते. ६.८ इंचाचा 1.5K Extreme AMOLED डिस्प्ले, १६५Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision आणि HDR10+ सपोर्टमुळे व्हिज्युअल अनुभव अधिक प्रभावी होतो.

Motorola Signature चा डिझाइन भागही तितकाच प्रीमियम आहे. फक्त ६.९९ मिमी जाडीचा हा स्मार्टफोन एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम आणि फॅब्रिक-प्रेरित Pantone™ फिनिशसह येतो. यामध्ये IP68 आणि IP69 वॉटर-डस्ट रेसिस्टन्ससह MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणाही देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे जो Signature Club प्रिव्हिलेजेससह येतो. यामध्ये २४x७ लाईव्ह एजंट सपोर्ट, लाइफस्टाइल सर्व्हिसेस, प्रवास, वेलनेस आणि वैयक्तिक सहाय्य सेवांचा समावेश आहे. याचबरोबर मोटोरोला कंपनीने Polar द्वारे समर्थित Moto Watch देखील लाँच केला असून तो प्रगत हेल्थ ट्रॅकिंग आणि क्लासिक डिझाइनचा अनुभव देतो.

Motorola Signature १२GB रॅम + २५६GB, १६GB रॅम + ५१२GB आणि १६GB रॅम + १TB या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार असून त्याची प्रभावी सुरुवातीची किंमत Rs. 54,999 इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३० जानेवारी २०२६ पासून Flipkart, Motorola.in आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Motorola Signature
Yoga Vs Gym एक्सरसाइज? वजन कमी करण्यासाठी काय आहे योग्य? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com