sabudana role recipe yandex
लाईफस्टाईल

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Sabudana Recipe: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नागरिक वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करत असतात. त्याचबरोबर काही लोकांचा उपवास देखील असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाही नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वत्र दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्याचबरोबर विशिष्ट गाण्यांच्या तालावर प्रत्येक गरबा आणि दांडीया प्रेमी नाचताना पाहायला मिळत असतात. पण नवरात्रीच्या नऊ दिवसांत काही लोकांचा उपवास असतो. उपवासादरम्यान रोज काय बनवावं असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. नेहमीच उपवासाला लोक साबुदाण्याची खिचडी,बटाट्याचे पदार्थ किंवा इतर पदार्थ बनवत असतात. म्हणून आज तुमच्यासाठी उपवासाची एक खास रेसिपी आणली आहे. साबुदाणा रोल रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही या रेसिपीला झटपट तयार करु शकता. चला जाणून घेऊया.

साहित्य

भिजवलेले साबुदाणे

उकळलेले बटाटे

किसलेले आले

शेंगदाणे

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

बारीक चिरलेली कोथिंबीर

सेंधा मीठ

काळी मिरी पावडर

तेल

बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम एक बाउल घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे आणि उकळलेले बटाटे टाका. यानंतर या मिश्रणाला चांगले मिक्स करुन घ्या. नंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. त्या कढईमध्ये शेंगदाणे टाकून ३ ते ४ मिनिट चांगले भाजून घ्या. नंतर गॅस बंद करुन शेंगदाण्यांना ताटात काढून थोडावेळ थंड होऊ द्या. नंतर शेंगदाण्यांना हाताने मॅश करुन त्याची साले काढून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्यांना टाकून ग्राईंड करुन घ्या. बारीक ग्राईंड केलेल्या शेंगदाण्याच्या कूटला मिश्रणात अॅड करा. यानंतर त्यात किसलेले आले, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सांधे मीठ, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर अॅड करा. यानंतर या सर्व गोष्टी एकत्रीतपणे नीट एकजीव करुन त्याचे पीठ तयार करुन घ्या.

दुसऱ्या स्टेपमध्ये हाताला थोडेसे ओले करुन घ्या. हात थोडेसे ओले असल्यावर थोडेसे साबुदाण्याचे मिश्रण घेऊन हाताच्या साहाय्याने रोल तयार करुन घ्या. अशाच पद्धतीने सर्व रोल तयार करुन घ्या. त्यानंतर रोल फ्राय करण्यासाठी कढईला गॅस वर ठेवा. गॅस ऑन करुन त्यात तेल टाकून तेल चांगले गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात एक- एक रोल्स टाकून मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. अशा पद्धतीने सर्व रोल्स दोन्ही बाजूंनी चांगले परतून घ्या. आपले उपवासाचे टेस्टी साबुदाणा रोल्स तयार झाले आहे. या रोल्सला तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT