Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

Lapsi Recipe Made at Home : घरच्याघरी टेस्टी लापशी कशी बनवायाची? या टिप्सने बनवाल तर घरात सर्वजण कौतुक करतील.
Lapsi Recipe Made at Home
Lapsi RecipeSaam TV
Published On

मऊ आणि गोड पदार्थ प्रत्येकाला खावेसे वाटतात. अशात सध्या घरोघरी नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यामुळे रोज गोड पदार्थ आणि मिठाई जेवणात असतेच. अशात बाहेरील मिठाई खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी स्वादिष्ट आणि काही पौष्टिक पदार्थ सुद्धा बनवू शकता. लहान मुलांना तिखट जेवणापेक्षा गोड पदार्थ फार जास्त आवडतात. त्यामुळे त्यांचे पोट भरावे तसेच त्यांना प्रोटीन्स देखील मिळावे यासाठी आज आम्ही एक भन्नाट रेसिपी शोधली आहे.

Lapsi Recipe Made at Home
Frankie Recipe: लहान मुलांसाठी १५ मिनिटांत बनवा चटपटीत फ्रँकी

आज आपण लापशी कशी बनवायची याची माहिती जाणून घेणार आहोत. लापशी प्रत्येकाच्या घरी बनवली जाते. मात्र अनेक व्यक्तींना लापशी बनवण्याची परफेक्ट रेसिपी काय आहे हे माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांची लापशी अगदी जास्त चिकट किंवा पातळ होते. तर काही वेळा लापशी गोड होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला परफेक्ट लापशी कशी बनवायची याची माहिती सांगणार आहोत.

साहित्य

लापशी - १ वाटी

दूध - २ कप

साखर - पाव वाटी

गूळ - पाव वाटी

वेलची - २ पाकळ्या

जायफळ - पाव चमचा

मीठ - चिमुटभर

तूप - १ वाटी

ड्रायफ्रूट्स - १ वाटी

कृती

सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात लापशी टाकून घ्या. लापशी यामध्ये चांगली भाजून घ्या. लापशी मस्त भाजून झाली की, ती एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या. त्यानंतर दुसरं एक पॅन घ्या. यामध्ये तूप टाकून घ्या. तुप थोड गरम होत आहे तोवर सर्व ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करून घ्या. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स मस्त तुपात भाजून घ्या. तसेच एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

हे सर्व करेपर्यंत लापशी थंड होते. त्यानंतर ही लापशी एका कुकरमध्ये टाका. यात पाणी टाकून लापशी चांगली शिजवून घ्या. आपल्याला लापशी किमान ३ शिट्ट्या काढून घेणे महत्वाचे आहे. लापशी मस्त शिजली की, पुढे एका पॅनमध्ये तूप घ्या. त्यात दूध मिक्स करा. त्यानंतर शिजलेली लापशी त्यात टाका. तसेच वरतून साखर आणि गूळ मिक्स करा. तसेच वेलची आणि जायफळांची पूड सुद्धा मिक्स करा. अशा पद्धतीने लापशी दुधात सुद्धा शिजवून घ्या. तसेच वरून मस्त काजू आणि बदामाचे काप टाकून घ्या. अशा पद्धतीने तयार झाली लापशी.

Lapsi Recipe Made at Home
Left Over Rice Recipe : मुलं पिझ्झा-बर्गर खाणं विसरून जातील; घरच्याघरी रात्री उरलेल्या पदार्थांपासून बनवा ही यम्मी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com