Best Exercise for Weight Loss google
लाईफस्टाईल

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Weight Loss: फिट राहण्यासाठी चालणं आणि धावणं यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला, फायदे आणि वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता ठरेल.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना फिट राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण अनेकांच्या आहारात जंक फूडचा समावेश असतो. त्याने तुमचा फॅट अचानक वाढू शकतो. त्यात ९ तास बसून काम करणाऱ्या व्यक्तींना या समस्येला जास्त सामोरं जावं लागतं. त्यात त्यांना जीमसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मग अशावेळेस ते चालणे किंवा धावणे हा सोपा पर्याय निवडतात.

चालणे किंवा धावणे हा सोपा पर्याय असला तरी त्यात अनेकांच्या मनात एक गंभीर प्रश्न असतो. तो म्हणजे, ३० मिनिटं धावणं की १ तास चालणं, फीट राहण्यासाठी कोणत्या पर्याय ठरेल बेस्ट. पुढे तज्ज्ञांनी याविषयी बेस्ट टिप्स दिल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, ३० मिनिटे धावल्याने कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी धावणं जास्त प्रभावी मानलं जातं. धावण्यामुळे हार्ट मजबूत होतं, स्टॅमिना वाढतो आणि मेटाबॉलिझम जलद गतीने काम करू लागतो. त्यामुळे कमी वेळेत फिटनेस मिळवायचा असेल, तर धावणं हा चांगला पर्याय ठरतो.

दुसरीकडे, १ तास चालणं हा देखील तितकाच फायदेशीर व्यायाम आहे. चालण्यामुळे शरीरावर कमी ताण येतो आणि सांध्यांवर दबावही कमी पडतो. विशेषतः नवशिक्यांसाठी किंवा आरोग्याच्या काही समस्या असणाऱ्यांसाठी चालणं जास्त सुरक्षित मानलं जातं. नियमित आणि दीर्घकाळ चालण्यामुळे हार्ट हेल्थ सुधारते आणि शरीर अॅक्टीव्ह राहतं.

खरं पाहता, चालणं आणि धावणं दोन्हीही फिटनेससाठी फायदेशीर आहेत. पण त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या फिटनेस गोल्स आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतो. जर तुमचं उद्दिष्ट वजन लवकर कमी करणं असेल, तर धावणं अधिक फायदेशीर ठरतं. पण दीर्घकाळ फिट आणि निरोगी राहायचं असेल, तर चालणं हा उत्तम पर्याय आहे.

तज्ज्ञांच्या मते, सर्वात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी चालणं आणि धावणं यांचा योग्य समतोल राखणं गरजेचं आहे. आठवड्यातून ३ दिवस धावणं आणि २ ते ३ दिवस वेगाने चालल्यावर शरीराला दोन्ही प्रकारच्या व्यायामाचे फायदे मिळतात. त्यामुळे फिटनेस टिकवून ठेवणं जास्त सोपं होतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT