Royal Enfield Electric Bike Launch Saam Tv
लाईफस्टाईल

Royal Enfield Electric Bike Launch : रॉयल एनफिल्ड देणार इलेक्ट्रिक बाइकला टक्कर, येत्या दोन वर्षांत लॉन्च करणार E-मोटरसायकल

Royal Enfield : रॉयल एनफील्ड या महिन्यात आपली नवीन मोटरसायकल लॉन्च करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

E-Motorcycle Launch In 2025 : रॉयल एनफील्ड या महिन्यात आपली नवीन मोटरसायकल लॉन्च करणार आहे, जी कदाचित न्यू जनरेशन बुलेट 350 आहे. आगामी काळात, हिमालयन 450 सोबत, रॉयल एनफिल्डची आणखी नवीन उत्पादने 350 सीसी ते 650 सीसी सेगमेंटमध्ये येणार आहेत.

या सगळ्यामध्ये रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक (Electric) मोटरसायकलबाबतही वेळोवेळी चर्चा होत असते. आता नवीन बातमी आली आहे की 2025 पर्यंत रॉयल एनफिल्ड आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय रस्त्यावर सादर करू शकते, सविस्तर पाहूयात.

मोठ्या गुंतवणुकीची शक्यता

IndiaCarNews च्या अहवालानुसार, आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सिद्धार्थ लाल म्हणतात की कंपनी रॉयल एनफिल्डच्या आगामी इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या प्रोटोटाइपची ट्रायल करत आहे आणि पुढील दोन वर्षांमध्ये तयार असेल त्याची प्रोडक्टशन रेडी वर्जन रस्त्यावर दिसू शकते.

रॉयल एनफिल्डने यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे, जी इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी येत्या काळात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड खूप आक्रमक होऊन ईव्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची तयारी करत आहे आणि आगामी काळात या संदर्भात घोषणा होऊ शकतात.

रॉयल एनफील्ड इंडियन मार्केटमध्ये जलवा

रॉयल एनफील्‍डने मिडसाईज मोटरसायकल (Motorcycle) सेगमेंटमध्ये राज्‍य केले आहे आणि क्‍लासिक 350, हंटर 350, बुलेट 350, स्‍क्रॅम 411 आणि 650 ट्विन्‍ससह अनेक लोकप्रिय मोटरसायकली विकल्या आहेत.

तथापि, अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत Triumph Speed ​​400 आणि Harley Davidson X440 सारख्या मोटरसायकलच्या प्रवेशामुळे काही गोष्टी बदलू शकतात आणि Royal Enfield ला अडचणी येऊ शकतात. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत रॉयल एनफिल्डने 918 कोटींचा नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील 611 कोटींच्या तुलनेत 50% वाढ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT