Upcoming Royal Enfield Bullet 350: Royal Enfield ने अखेर नवीन Bullet 350 च्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. नवीन बुलेट 350 ची गेल्या एका वर्षाहून अधिक काळ चाहते वाट पाहत आहेत. टेस्टिंग दरम्यान याचे अनेक स्पाय शॉट्स देखील समोर आले आहेत.
बुलेट बाईकचे सर्वात जुने आणि सर्वात लोकप्रिय मॉडेल 30 ऑगस्ट रोजी त्याच्या नेस्ट जनरेशनमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी यामध्ये कोणते बदल करणार आहे ते जाणून घेऊया. (Latest Auto News in Marathi)
इंजिन
नवीन बुलेटमधील सर्वात मोठा बदल नवीन 349cc J-प्लॅटफॉर्म इंजिन असेल. ही इंजिन सध्याच्या क्लासिक 350, हंटर 350 आणि Meteor 350 मध्येही देण्यात आले आहे. हे 20.2hp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केले गेले आहे. जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)
बुलेट सध्या अधिक परवडणाऱ्या किक-स्टार्ट-ओन्ली व्हेरियंटमध्ये, तसेच इलेक्ट्रिक स्टार्टरसह महाग व्हेरियंटमध्ये ऑफर केली जाते. नवीन अपडेटनंतर मागील अपडेट यापुढे ऑफर केले जाणार नाही. नवीन इंजिन मिळाल्यानंतर, बुलेटला 346cc UCE इंजिन मिळणार नाही.
क्लासिकच्या तुलनेत फरकाबद्दल बोलायचे झाल्यास, हे सीट, हेडलाइट आणि टेल-लॅम्प सारख्या भागांपुरते मर्यादित असेल. क्लासिकला स्प्लिट सीट मिळतात, तर बुलेटला सिंगल-पीस सीट मिळेल, जसे सध्याच्या मॉडेलमध्येही पाहायला मिळते. क्लासिकच्या हेडलाइटवरील हुड बुलेटपर्यंत पोहोचणार नाही आणि टेल-लॅम्पची डिझाइन कदाचित वेगळी असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.