लाईफस्टाईल

Cancer treatment effects on fertility: कॅन्सरच्या उपचारपद्धतींमुळे महिला-पुरुषांना वंध्यत्वाचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकी कारणं सांगितली!

Cancer treatment effects on fertility: गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशभरात कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. यावेळी अनेक महिला आणि पुरुष रुग्ण कॅन्सरच्या उपचारानंतर प्रजनन समस्याशी लढा देतात.

Surabhi Jagdish

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशभरात कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. कॅन्सर बरा झाल्यानंतर देखील त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अनेक महिला आणि पुरुष रुग्ण कॅन्सरच्या उपचारानंतर प्रजनन समस्याशी लढा देतात. कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांचा क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम तात्पुरते किंवा कायमचे असू शकतात.

मुंबईच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या क्लिनिकल डायरेक्टर डॉ सुलभा अरोरा म्हणाल्या की, कॅन्सर उपचाराने प्रजननास हानी पोहोचण्याचा धोका हे रुग्णांचे वय, कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा त्याचप्रमाणे कॅन्सरच्या उपचार पद्धतींवर अवलंबून असते.

कॅन्सरच्या उपचारांचा प्रजनन क्षमतेवर कसा होतो परिणाम

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी ही रूग्णाच्या Reproducible अवयवांवर परिणाम करतात. याशिवाय यामुळे हार्मोन्सच्या पातळीमध्ये देखील व्यत्यय येतो. परिणामी स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. वंधत्वामु्ळे काही जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. जर अशा महिलेला गर्भधारणा करायची असल्यास त्यांना तत्काळ मार्गदर्शनाची गरज भासते.

कॅन्सरवरील उपचार आणि वंध्यत्वाची समस्या

डॉ. अरोरा पुढे म्हणतात की, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी घातक पेशींना नष्ट करण्यासाठी ओळखल्या जातात परंतु ते प्रजनन प्रणालीवर वाईट परिणाम करतात. काही अभ्यासांनुसार असं समोर आलंय की, स्त्रियांचं अंडाशय अकाली निकामी होऊ शकते किंवा अंड्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. याशिवाय पुरुषांना कॅन्सरच्या उपचारांमुळे स्पर्मचं उत्पादन कमी होऊ शकतं. अशावेळी कॅन्सरच्या रुग्णांनी पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रजनन सल्लागारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

कॅन्सरच्या रूग्णांना गर्भधारणेसाठी महत्वाच्या टिप्स

डॉ. अरोरा यांनी पुढे सांगितलं की, गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांसाठी काही ठराविक उपचार आशेचा किरण ठरतात. गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी एग फ्रीझिंग आणि स्पर्म बँकिंग सारखे पर्याय फायदेशीर ठरतात. यशस्वी गर्भधारणेसाठी जोडप्यांनी स्वत: ला विविध प्रजनन उपचार पर्यायांबद्दल जागरुक करणं गरजेचं आहे.

प्रजनन क्षमता चांगली ठेवण्यासाठी अत्याधुनिक पर्याय जसं की, ओव्हेरियन टिश्यू क्रायोप्रिझर्व्हेशन आणि टेस्टिक्युलर टिश्यू फ्रीझिंग यांसारख्या प्रक्रियांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरच्या रुग्णांनी हरुन न जाता या गंभीर आजाराच्या उपचारानंतरही यशस्वी गर्भधारणा करता येते हे लक्षात ठेवावं, असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT