Summer Baby Care Saam Tv
लाईफस्टाईल

Baby care in Summer: राज्यात उन्हाचा पारा चढला; लहान मुलांची काळजी कशी घ्याल?

Baby Care Tips : उन्हाळा हा अनेक आरोग्य आणि त्वचेच्या समस्या घेऊन येतो ज्यामुळे तुमचे बाळ चिडचिडे आणि अस्वस्थ होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

सर्वच ऋतूमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते असते. परंतु, उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे लहान मुलं व नवजात बाळाची खास काळजी घ्यावी लागते. तापमान जास्त असल्यामुळे बाळाच्या आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे तसेच मुलांचे डिहायड्रेशन होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी लागते.

पुण्यातील खराडीच्या मदरहूड हॉस्पिटलमधील नवजात शिशु आणि बालरोगतज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात डायपर रॅशेस, उष्माघात, डिहायड्रेशन आणि बाळांना भूक न लागणे अशा काही समस्या आढळून येतात. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना घाम येत नाही आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. या वाढत्या तापमानात आपल्या बाळाला थंड ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून त्याचा बचाव करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा.

बाळाला हायड्रेटेड ठेवा

बाळाला वारंवार स्तनपान करवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याचे निर्जलीकरण होणार नाही. सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाल तुम्ही पाणी देऊ शकता.

दुपारी मुलांना घराबाहेर काढणे टाळा

पालकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलांना बाहेर घेऊन जाणे, खेळायला पाठवणे टाळा. तुमच्या बाळाची त्वचा अगदी नाजूक असून सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तिचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे गरज नसल्यास भर उन्हात बाहेर न पडता संध्याकाळी बाहेर पडणे योग्य राहिल. सनबर्नच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

सुती कपडे घाला

नवजात बाळाला फक्त हलक्या मलमलच्या किंवा सुती कापडाने गुंडाळा आणि अंगावर ब्लॅंक्ट, गोधडी घालणे टाळा.दिवसभर डायपर वापरणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या नाजुक त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. बाळाला जाड कपडे घालणे टाळा. शक्यतो हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर करा.

बाळाची मालीश करा

मालाश केल्याने बाळाला आराम मिळू शकतो आणि त्याला चांगली झोप येण्यास मदत होते. पण मालीश करताना खुप जोर लावणे टाळा, मालीश करताना हलक्या हाताने मालीश करावी.

एसीचा वापर करताना खबरदारी घ्या

एसीचा वापर करत असल्यास योग्य तापमान सेट करा जेणेकरुन खोली खूप थंड नसावी. 26 अंश तापमान हे तुमच्या बाळासाठी योग्य आहे.

बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला

बाळाला अतिशय गरम पाण्याने आंघोळ घालू नका. यासाठी कोमट पाणी निवडणे योग्य राहिल. बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी पाण्याचे तापमान तपासा.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उत्पादने वापरा

जर तुम्ही कोणतेही बेबी लोशन, मसाज तेल, साबण किंवा इतर त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच त्यांचा वापर करा. बऱ्याच वेळा काही उत्पादनांमुळे बाळाला ऍलर्जी होऊ शकते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT