Saam Tv
लहान बाळ अचानक रडत उठण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.
लहान बाळांचे पोट लहान असल्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते. भूक लागल्यास ते रडून आपली गरज व्यक्त करतात.
पोटात गॅस अडकल्यास किंवा गॅस झाल्यास बाळाला अस्वस्थता होते आणि त्यातून ते रडते.
बाळाला खूप थंडी किंवा उष्णता सहन होत नसेल, तर ते रडून अस्वस्थता व्यक्त करते.
बाळ थकलेले असले, पण झोपू शकत नसेल तर ते रडण्याचा प्रयत्न करते.
बाळांना देखील झोपेत स्वप्न पडू शकते, ज्यामुळे ते अचानक दचकून रडू लागतात.
बाळ नव्या जागी असेल किंवा आजूबाजूला खूप आवाज असेल, तर बाळ अस्वस्थ होऊन रडू शकते.
काही वेळा बाळाला ताप, सर्दी, पोटदुखी किंवा इतर आजार असू शकतात, ज्यामुळे बाळ अस्वस्थ होऊन रडते.
वाढीच्या टप्प्यांवर बाळांच्या झोपेच्या पद्धतीत बदल होऊ शकतात, ज्यामुळे ते अचानक रडण्याची शक्यता असते.
NEXT: सखी गोखलेचा क्लासी फॉर्मल अंदाज