Rishi Panchami 2023 Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Rishi Panchami 2023 Recipe : पौष्टिक आणि चविष्ट पद्धतीने ऋषीपंचमीला बनवा ऋषीची भाजी, पाहा पारंपारिक रेसिपी

Rishi Panchami Date 2023 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीला हिंदू धर्मात अधिक महत्त्व आहे.

कोमल दामुद्रे

How To Make Rishi Bhaji :

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीला हिंदू धर्मात अधिक महत्त्व आहे. ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. या सणात सात ऋषीबद्दल आदर व्यक्त केला जातो.

यंदा ऋषीपंचमी ही २० सप्टेंबरला साजारी केली जाईल. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे असून या दिवशी ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. या दिवशी कांदा-लसूण न वापरता भाजी बनवली जाते. जाणून घेऊया पौष्टिक आणि चविष्ट पद्घतीने भाजी कशी बनवायची

1. साहित्य

  • २-३ चमचे तेल (Oil)

  • २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • १० चिरलेली अळूची पाने

  • १ कप बारीक केलेली अरवी

  • १ कप रताळ्याचे काप

  • ५-६ भेंडीचे तुकडे

  • १ कप कच्च्या केळीचे (Banana) तुकडे

  • १ कप अळूचे देठाचे तुकडे

  • १ कप सुरणचे तुकडे

  • १ कप भोपळ्याचे तुकडे

  • १ कप शिराळीचे तुकडे

  • १ कप लाल माठ

  • कणीस (Corn)

  • १ कप भिजवलेले शेंगदाणे

  • १ कप ओलं खोबरं

  • मीठ

  • हळद

2. कृती

  • सर्वप्रथम पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची घाला.

  • नंतर सर्व भाज्या एकत्र करुन घाला. मीठ आणि किसलेले खोबरे घालून चांगले ढवळून घ्या.

  • थोडे पाणी घालून झाकण ठेवून १० मिनिटे भाजी चांगली शिजू द्या.

  • १० मिनिटानंतर झाकण काढून चांगले ढवळून घ्या. हळद आणि मीठ घालून पुन्हा ढवळा

  • पुन्हा ५ मिनिटे भाजी झाकून ठेवा आणि चांगल्याप्रकारे शिजू द्या.

  • तयार भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

SCROLL FOR NEXT