Right Time To Sleep Saam Tv
लाईफस्टाईल

Right Time To Sleep : उशीरा झोपल्यामुळे हृदयविकाराचा धोका! झोपेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Sleep Affect Heart Rate : झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचे आजार वाढण्याची शक्यता अधिक आहे असे संशोधनातून समोर आले आहे.

कोमल दामुद्रे

Sleep Affect Heart :

धावत्या जीवनशैलीनुसार आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कामाच्या गडबडीत आपण आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाही. वाढती स्क्रीन टाइम आणि चहा-कॉफीच्या अधिकच्या सेवनाचा आपल्या झोपेवर परिणाम होतो.

झोपेच्या बिघडलेल्या गणितामुळे आपल्याला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, झोपताना फोनचा आपण अधिक प्रमाणात वापर करतो. ज्यामुळे आपल्याला निद्रानाशाच्या समस्येला बळी पडावे लागते. परंतु, जर आपण दररोज झोपायला १ ते १.५ तास उशीर केल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

झोपेच्या (Sleep) कमतरतेमुळे हृदयविकाराचे आजार वाढण्याची शक्यता अधिक आहे असे संशोधनातून समोर आले आहे. झोपण्याची वेळ देखील ठराविक असायला हवी. उशीरा झोपल्यामुळे सेल्यलर नुकसान, जळजळ आणि हृदयविकाराची शक्यता वाढते. त्यामुळे वेळ आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. झोपेचे वेळापत्रक कसे राखायला हवे हे जाणून घेऊया

1. तणाव कमी करा

अधिक प्रमाणात ताण घेतल्यानंतर झोप येण्याचा त्रास उद्भवतो. त्यासाठी तणावावर मात्र कशाप्रकारे करता येईल हे पाहा. ध्यान, योग (Yog), चालणे इत्यादीचा दिनक्रम ठरवा. ज्यामुळे तणाव कमी होईल.

2. व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहाते. तसेच शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे झोप लवकर येण्यास मदत होते. परंतु, झोपण्यापूर्वी व्यायाम करु नका.

3. फोनचा वापर नको

झोपण्यापूर्वी फोन (Phone) वापरण्याची सवय अधिकांना असते. फोनमधून येणाऱ्या प्रकाशामुळे झोपेचा त्रास होतो ज्यामुळे झोप चांगली लागत नाही. त्यामुळे झोपण्याच्या एक तासाआधी फोन वापरु नका

4. आहाराची काळजी घ्या

झोपण्यापूर्वी कॉफी, चहा, तंबाखू आणि दारूचे सेवन करू नका. खूप तेलकट किंवा मसालेदार अन्न खाऊ नका आणि झोपण्यापूर्वी ३ तासाआधी जेवण करा. ज्यामुळे तुमचे झोपेचे चक्र बिघडू शकते. तसेच आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, दूध, दही इत्यादींचा समावेश करा.

5. झोपण्याची योग्य वेळ निश्चित करा

दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. ठराविक वेळेत झोपा आणि सकाळी लवकर उठा. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहिल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT