Resume Format Tips in Marathi Resume Format Tips - Yandex
लाईफस्टाईल

Resume Format Tips: मुलाखतीसाठी आकर्षक रेझ्युम हवा? 'या' व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त पाठवा 'Hi', जाणून घ्या संपूर्ण माहिती

Resume Format: निवड प्रक्रियेमध्ये प्रतिभावान उमेदवाराचा शोध घेण्यासाठी तसेच तरुणांच्या कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी रेझ्युम हा अत्यंत उपयुक्त माध्यम असते.

Bharat Jadhav

Tips For Resume Format:

नोकरीच्या शोधात असलेल्या बहुतेकांना नोकरीच्या मुलाखतीची संधी येत असते. परंतु त्यांचा रेझ्युम चांगला नसल्यानं त्यांना नोकरी मिळत नाही. यामुळे रोजगाराची चांगली संधी उपलब्ध असली तरी त्यांना पहिल्या पायरीवरच अपयशाचा सामना करावा लागतो. युवकांची ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक उपक्रम सुरू केलाय. (Latest News)

या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या म्हणजेच एाआयच्या सहाय्याने डिजिटल रेझ्युम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतण्यात आलाय. यासाठी राज्यातील लाखो युवकांना ८६५५८२६६८४ (86558 26684) या व्हॉट्सअप क्रमांकावर केवळ Hi पाठवावा लागेल. त्यानंतर काही सोप्या पश्नांची उत्तरे द्यावे लागतील. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत उत्तम दर्जेदार आणि परिपूर्ण रेझ्युम उपलब्ध होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रातील युवकांना सुयोग्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी डिजीटल माध्यमातून तयार करण्यात आलेला रिझ्युम उपयुक्त ठरू शकणार आहे. या उपक्रमामुळे एक लाखाहून अधिक युवकांना ही सेवा मिळू शकणार आहे. महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. चांगला रोजगार मिळावा यासाठी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सॅपीओ अनालिस्टिक्सच्या सहकार्यातून या उपक्रमांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून २८० जॉब फेअरर्सचे आयोजन करण्यात आलेत.

भविष्यातही सातत्याने अशा जॉब फेअरचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवकांकडून अशा जॉब फेअर्समध्ये सहभाग घेऊन भरती प्रक्रियेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अनेकांकडे चांगला रेझ्युम नसल्यामुळे त्यांची निवड होत नाही. निवड प्रक्रियेमध्ये प्रतिभावान उमेदवाराचा शोध घेण्यासाठी तसेच तरुणांच्या कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी रेझ्युम हा अत्यंत उपयुक्त माध्यम असते.

चांगला रेझ्युम नसल्याची समस्या दूर करण्यासाठी मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राती युवकांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रिझ्युम तयार करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी देण्यात आलेल्या (८६५५८२६६८४) या व्हॉट्सअप क्रमांकवर Hi पाठवण्याचे आवाहन लोढा यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT