Mumbai Suburban News: मुंबई उपनगरात झोपडपट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Mangal Prabhat Lodha News: मुंबई उपनगरात झोपडपट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSaam Tv
Published On

Mumbai Suburban News:

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी आजवर दुर्लक्षित होती. ती सोडवण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी पुढाकार घेतला असून, येत्या काळात उपनगरातील वस्त्यांमध्ये ४०,००० शौचालये बांधण्यात येणार आहेत. यापैकी १२,००० शौचालये नव्याने बांधण्यात येतील, तर २८,००० शौचालयांची पुनर्बांधणी करून त्यांना नवे रूप देण्यात येणार आहे.

Mangal Prabhat Lodha
Nanded News: 'मी जातीय भावनेतून काही केलं नाही', त्या घटनेवर खासदार हेमंत पाटील यांचं स्पष्टीकरण

पालकमंत्री लोढा यांनी या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  (Latest Marathi News)

पालकमंत्री लोढा म्हणाले की,मुंबई उपनगरातील झोपडपट्टीवासियांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, आखण्यात आलेल्या शौचालय उभारण्याच्या योजनेचा आज शुभारंभ झाला याचा आनंद आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी अत्याधुनिक दर्जाची, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उभारण्यात येतील.

Mangal Prabhat Lodha
Sanjay Singh Arrested: मोठी बातमी! आप खासदार संजय सिंह यांना ईडीने केली अटक, काय आहे प्रकरण?

ते म्हणाले, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण मुंबई उपनगरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या कोणत्याही मागणीकडे किंवा समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com