Nanded News: 'मी जातीय भावनेतून काही केलं नाही', त्या घटनेवर खासदार हेमंत पाटील यांचं स्पष्टीकरण

Nanded Dean Clean Toilet Issue: 'मी जातीय भावनेतून काही केलं नाही', त्या घटनेवर खासदार हेमंत पाटील यांचं स्पष्टीकरण
MP Hemant Patil On Nanded Dean Clean Toilet Issue
MP Hemant Patil On Nanded Dean Clean Toilet IssueSaam Tv
Published On

>> संजय सूर्यवंशी

Nanded Dean Clean Toilet Issue :

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावून अपानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेना ( शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांच्यासह 10 ते 15 जणांविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी माणसाला कधी जात विचारात नाही. हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता होती आणि त्यांच्यासोबत मी देखील सफाई केली. पण जातीय राजकारणातून गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

MP Hemant Patil On Nanded Dean Clean Toilet Issue
Sanjay Singh Arrested: मोठी बातमी! आप खासदार संजय सिंह यांना ईडीने केली अटक, काय आहे प्रकरण?

''मी जातीवाचक बोललो नाही , अपमान केला नाहीं शिवीगाळही केली नाही. लोकप्रतिनिधीने लोकसेवकाला कर्तव्याची जाणीव करून द्यायची नाही का? रोज रुग्ण मरत पावत आहेत . मग त्यांचा सत्कार करायचा का? असा सवाल त्यांनी केला. जाब विचारणे गुन्हा असेल तर मला मान्य आहे. मी जामीन घेणार नाही. न्यायालय जी शिक्षा देईल ती मला मान्य असल्याचं हेमंत पाटील म्हणाले''.  (Latest Marathi News)

रुग्णालयाचे डीन शामराव वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन हेमंत पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 353 , कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) आणि 3 (2) अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MP Hemant Patil On Nanded Dean Clean Toilet Issue
Maharashtra Politics: 'शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला होता सल्ला', फडणवीस यांचा गौप्यस्फोट

नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांना रुग्णालयात अस्वच्छताअसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन शामराव वाकोडे यांना रुग्णालयातील शौचालय साफ करायला लावलं. त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com