Maharashtra Politics: 'शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला होता सल्ला', फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis on Sharad Pawar: 'शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला होता सल्ला', फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis on Sharad Pawar
Devendra Fadnavis on Sharad PawarSaam TV
Published On

Devendra Fadnavis on Sharad Pawar:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर शरद पवार यांना भाजपसोबत सरकार स्थापन करायचे होते.''

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2023 मध्ये बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, ''भाजपशी हातमिळवणी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून पवारांनी त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला दिला होता.''

Devendra Fadnavis on Sharad Pawar
Indian Railways: भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, जाणून घ्या का?

वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली. यानंतर शरद पवार यांनी भाजपशी संपर्क साधला आणि सरकार स्थापन करण्यासाठी युती करण्याचा सल्ला दिला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Latest Marathi News)

फडणवीस पुढे म्हणले की, जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते, तेव्हा प्रत्येक पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं जातं. सरकार स्थापन करण्याचं निमंत्रणपत्र राष्ट्रवादी पक्षालाही देण्यात आलं.

Devendra Fadnavis on Sharad Pawar
LPG Cylinder : दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं 'गिफ्ट'; अवघ्या ६०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

यावर आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलं. हे पत्र माझ्याच घरी टाईपकरण्यात आलं होतं. शरद पवारांनी त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यानंतर हे पत्र पुढे पाठवण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी राजवट लागू करण्यात आली होती, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com