Sanjay Singh Arrested: मोठी बातमी! आप खासदार संजय सिंह यांना ईडीने केली अटक, काय आहे प्रकरण?

AAP MP Sanjay Singh Arrested: मोठी बातमी! आप खासदार संजय सिंह यांना ईडीने केली अटक, काय आहे प्रकरण?
Sanjay Singh Arrested
Sanjay Singh ArrestedSaam Tv
Published On

AAP MP Sanjay Singh Arrested:

एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळ्यात ईडीने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. याप्रकरणी सिंह हे अटक करण्यात आलेले आपचे तिसरे नेते आहेत.

दिवसभर त्याच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर ईडीने त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास अटक केली. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, संजय सिंह यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

Sanjay Singh Arrested
Maharashtra Politics Explainer : युती सरकारमध्ये अजित पवारांचं पारडं जड? समजून घ्या राजकीय गणितं

संजय सिंह यांच्याआधी दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. सिसोदिया फेब्रुवारी महिन्यापासून तुरुंगात आहेत. सिसोदिया यांचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आता त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, संजय सिंह यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमी पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अटकेनंतर सिंह यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.

Sanjay Singh Arrested
Maharashtra Politics: 'शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला होता सल्ला', फडणवीस यांचा गौप्यस्फोट

सकाळी ७ वाजल्यापासून ईडीची टीम त्याच्या घरी हजर होती आणि सुमारे १० तासांनंतर त्यांना अटक करण्यात आली. संजय सिंह यांची अटक हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर पक्षाच्या कामकाजात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com