Instagram मध्ये होणार 'हे' मोठे बदल, कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा; वाचा सविस्तर...

Instagram मध्ये होणार 'हे' मोठे बदल, कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा; वाचा सविस्तर...
Instagram Updates
Instagram UpdatesSaam Tv

Instagram Updates:

इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक खास बातमी आहे. लवकरच Instagram मध्ये अनेक नवीन फीचर्स अपडेट केले जाणार आहेत. नवीन अपडेट आल्यानंतर युजर्स रील, फीड फोटो, कॅरोसेल (स्लाइडिंग फोटो) आणि स्टोरीज पूर्वीपेक्षा चांगले बनवता येतील. कंपनीने म्हटले आहे की, ते कंटेंट क्रिएटर्ससाठी इन्स्टा अपडेट करणार आहे, जेणेकरून ते त्यांच्या कंटेंटवर अधिक चांगला परफॉर्मन्ससह एडिट करू शकतील.

याबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, ''आज आम्ही रील, फीड फोटो, स्टोरी आणि नवीन इनसाइट्स सादर करत आहोत. नवीन इनसाइट्सच्या मदतीने, कंटेंट क्रिएटर्स समजू शकतील की, त्यांचा कंटेंट कसा परफॉर्म करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Instagram Updates
7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे 'ही' कार, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Reels साठी एडिटिंग टूल्स

इंस्टाग्रामने म्हटले आहे की, ते युजर्ससाठी नवीन फीचर्स आणत आहे. यामध्ये ते पर्सनल क्लिप क्रॉप आणि क्लिप्स को रोटेड करू शकतील. तसेच लवकरच undo आणि redo पर्याय देखील यात समाविष्ट केला जाईल. याशिवाय अनेक नवीन फीचर्सही पाहायला मिळतील. (Latest Marathi News)

आणखी नवीन फीचर्स मिळणार

कंपनीने सांगितलं की, आम्ही यात 10 नवीन इंग्लिश टेक्स टू स्पीच व्हॉइस यात समाविष्ट करणार आहोत, त्यापैकी कोणताही एक निवडता येईल. हे अपडेट नुकतेच निवडक देशांसाठी रिलीझ करण्यात आले आहे.

Instagram Updates
Realme 11x 5G Review: प्रत्येकाच्या बजेटमधला ५ जी मोबाईल; जाणून घ्या मोबाईलचा लूक अन् फिचर्स

इंस्टाग्राम ऑडिओ ब्राउझर किंवा ट्रेंडिंग ऑडिओमध्ये प्रवेश करण्याचा एक नवीन मार्ग तयार करत आहे. याची टेस्ट सध्या सुरू आहे. याशिवाय, कंटेंट Draft फीचर्सचेही मेकओव्हर केलं जाणार आहे. युजर्सला Draft ही पाहायला मिळणार आहेत. तसेच ते लवकरच आपला कंटेंट शेड्युलही करू शकतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com