Tips For Prajasattak Din Bhashan ANI
लाईफस्टाईल

Republic Day Speech Tips: प्रजासत्ताक दिनी द्या दमदार भाषण, फॉलो करा 'या' टिप्स मिळेल टाळ्यांची दाद

Tips For Prajasattak Din Bhashan यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिनी साजरा करणार आहोत. या दिवशी तु्म्हाला शाळेत किंवा कुठल्या संस्थेत भाषण करायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Bharat Jadhav

Republic Day 2024 Bhashan Tips:

यंदा आपण सर्वजण आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिन देशाच्या स्वातंत्र्य, अखंडतेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. प्रजासत्ताक दिन हा भारत देशाचा प्रमुख राष्ट्रीय सण आहे. दरवर्षीप्रमाणे भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण ३ वर्षांनी भारतीय राज्यघटना देशभरात लागू करण्यात आली. (Latest News)

प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये निबंध, भाषणांसह अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी जर तुम्ही भाषण सादर करणार असाल तर भाषण कसे सादर करावे याच्या काही टीप्स आपण फॉलो केले पाहिजे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी करा भाषणाची सुरुवात

भाषणाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपली ओळख सांगून उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोत्यांचे आभार मानावेत. सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त काही माहिती देणार आहे, ते तुम्ही शांतेत ऐका. भाषण देताना तुम्ही तुमच्या श्रोत्यांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक समजून सांगावा. हे दोन्ही का साजरे केले जातात. त्याची माहिती द्यावी.

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश गुलामगिरीच्या बंधनातून नक्कीच मुक्त झाला. मात्र, देशाची शासन व्यवस्था चालवण्यासाठी संविधान नव्हते. यावेळी देशाचे नियम आणि कायदे बनवण्यासाठी ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची घोषणा करण्यात आली. ज्यांनी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांत देशाची राज्यघटना तयार केली. २६ जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन १९५० साली या दिवशी संविधान देशात लागू करण्यात आले.

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला. राज्यघटनेनुसार भारत लोकशाहीप्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं.

त्यामुळे दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी २१ तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं आणि भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केलं. भाषणाच्या शेवटी सर्वांचे धन्यवाद मानून भाषणाचा शेवट करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का?  'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

SCROLL FOR NEXT