White Hair Remedy  Saam TV
लाईफस्टाईल

White Hair Remedy : पांढरे केस काळे करण्यासाठी १०० वर्षे जुनं औषध सापडलं; आजच तुम्हीही ट्राय करा

Remedy For White Hair : डाय जास्त केमिकलपासून बनवलं जातं. त्यामुळे केस काळे होतात, मात्र ते जास्त दिवस टिकत नाही. अगदी आठवडाभरातच केस पुन्हा पांढरे दिसू लागतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अगदी तरुण मुला-मुलींमध्ये केस पांढरे होण्याच्या समस्या आहेत. पांढरे केस झाल्यावर आपलं वय जास्त आहे असं वाटतं. त्यामुळे सर्वजण डाय वापरतात. मात्र डाय जास्त केमिकलपासून बनवलं जातं. त्यामुळे केस काळे होतात, मात्र ते जास्त दिवस टिकत नाही. अगदी आठवडाभरातच केस पुन्हा पांढरे दिसू लागतात.

केस पांढरे झाले की पुन्हा डाय लावला जातो. मात्र सतत डाय लावल्याने केस जास्त खराब होतात. केस जास्त गळतात आणि विरळ होतात. इतकंच नाही तर काही व्यक्तींना डायमुळे अंधत्व सुद्धा येतं. आता सध्याच्या युगात चंत्रज्ञान पुढे गेलं आहे त्यामुळे आपण डाय लावतो. मात्र पूर्वीच्या काळी देखील व्यक्तींचे केस पांढरे होत असतील तर तेव्हा या व्यक्ती कोणत्या डायचा वापर करत असतील असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी तब्बल १०० वर्षे जुना रामबाण उपाय शोधला आहे.

साहित्य

१ वाटी जायफळ

१ वाटी वेलची

२ चमचे मेथीचे दाणे

मुठभर कडीपत्त

आवश्यकतेनुसार पाणी

कृती

सर्वात आधी एक वाटी घ्या. वाटी थोडी मोठी घ्या जेणेकरून वरील सर्व सामग्री एकत्रीतपणे यात मावेल. त्यानंतर यामध्ये जायफळ, वेलची, मेथीचे दाणे, कडीपत्ता आणि पाणी मिक्स करून रात्रभर तसेच ठेवा.

दुसऱ्या दिवशी एका मोठ्या पातेल्यात किंवा कढईत भिजलेल्या सर्व गोष्टी काढून घ्या.

त्यानंतर जायफळ आणि अन्य सर्व गोष्टी कुसकरून घ्या.

पुढे यातील बिया किंवा जाड राहिलेला भाग काढून टाका आणि रस गाळून घ्या.

सर्व गोष्टी ज्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या ते पाणी देखील घ्या.

दररोज अंघोळीला जाण्याआधी केसांवर हे पाणी लावा.

आढवड्यातून किमान २ वेळा तरी या पद्धतीने केस स्वच्छ करा.

ही ट्रिक वापरल्याने तुमचे केस हळूहळू महिन्याभरात काळे होतील. इतकेच नाही तर केस गळणे देखील बंद होईल. तसेच केस जाड आणि घट्ट होतील.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. हा उपाय करून केस काळे होतीलच असा दावा साम टीव्ही करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Maharashtra Live News Update: पालघरच्या एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट; एकाचा जागीत मृत्यू

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

SCROLL FOR NEXT