Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांचे केस दिवसभर मोकळे असतात. त्यामुळे त्यांचे केस खूप रफ होतात. बऱ्याचदा प्रवासामुळे त्यांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
पुढे आपण अशी १ सोपी ट्रिक जाणून घेणार ज्याच्या मदतीने तुम्ही महागड्या पार्लरला न जाता घरच्या घरी तुम्ही ही ट्रिटमेंट करु शकता.
एका बाउलमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि त्यात तुमचा तुम्ही वापरत असलेला शॅम्पू व पाणी मिक्स करा.
आता हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. त्यामुळे तांदळातील पोषक घटक त्यात मिक्स होईल आणि केसांवरही रिजल्ट दिसेल.
दुसऱ्या दिवशी हे मिश्रण नीट हलवून केस धुण्यासाठी वापरा.
तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन्स आणि अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केस मजबूत करतात.
तुम्ही हा उपाय केसांची वरची लेयर स्मूद करून त्यांना नैसर्गिक चमक देतो.
तांदळाचे पाणी केसांचा कोरडेपणा कमी करून केस मऊ आणि मॅनेज करण्यास सोपं बनवतं.
तुम्ही हे मिश्रण केस स्वच्छ करताना स्काल्पलाही लावू शकता. याने केसांना पोषण मिळतं आणि ताजेपणाही मिळतो.