Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलं वाचलेलं लगेच विसरून जातात? न ओरडता करा 'हे' उपाय, सगळं तोंड पाठ होईल

Children Sharp Memory : मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी आणि मुलांनी केलेले पाठांतर लक्षात राहण्यासाठी पालकांनी मुलांच्या अभ्यासाच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करा. नियमित मुलांनी केलेल्या अभ्यासाची उजळणी घ्या.

Shreya Maskar

आजकाल वाढत्या स्पर्धेमुळे मुलांचा अभ्यासक्रमही वाढत जात आहे. तसेच तो कठीणही होत आहे. त्यामुळे मुलांना पाठांतर केलेले लक्षात रहात नाही. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसून येतो. मुलांना अभ्यासात कमी गुण मिळतात. अशावेळी पालकांनी मुलांना ओरडण्यापेक्षा त्यांना अभ्यासात मदत करा. त्यांच्याकडून योग्य पद्धतीने पाठांतर करून घ्या. जे त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील.

सराव

मुलांचं पाठांतर चांगलं होण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडून सराव करून घ्या. मुलांना पुस्तकाची भाषा कठीण वाटत असेल तर पालकांनी सहज सोप्या भाषेमध्ये मुलांना समजवून सांगा. जो वर मुलांना समजत नाही. तोवर सांगा. कंटाळा करू नका.

उदाहरण

एखादा विषय मुलांना वारंवार सांगूनही समजत नसेल तर त्यांना उदाहरण देऊन सांगा. उदाहरण देऊन मुलांना शिकवल्यास त्यांच्या लक्षात चांगले राहते. कारण मुलं उदाहरण लक्षात ठेवतात. मुलांना उदाहरण देताना रोजच्या वापरातील किंवा त्यांच्या अवतीभोवतीची उदाहरण द्या, म्हणजे ते मुलांना लवकर समजेल.

मनोरंजन

मुलांना मनोरंजनातून अभ्यासाची गोडी लावा. कारण अभ्यासाची गोडी लावल्यामुळे मुलांच अभ्यासात लक्ष लागून राहते. मुलांसाठी मनोरंजन हे खेळांमधून निमार्ण करा. मुलांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ खेळून त्यांची स्मरणशक्ती वाढवा. मुलांच्या मनोरंजनासाठी मुलांकडून विविध उपक्रम करून घ्या. उदा. त्यांच्या कविता पाठांतर करून घेण्यासाठी त्यांना दिवसातून दोन - तीन वेळा कविता बोलायला सांगा. त्यांची प्रशंसा करा. पालकांनी मुलांना कवितेला चाल लावून द्या म्हणजे गाण्याच्या चालीवर मुलांना कविता लक्षात राहतील.

अभ्यासाची जागा

मुलांच्या अभ्यासाची जागा प्रकाशमय असेल याची काळजी घ्या. गणिताची सूत्र, विज्ञानाच्या व्याख्या, इतिहासातील तारखा लक्षात राहण्यासाठी मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात. तिथे एक तक्ता लावून ठेवा. म्हणजे मुलांच्या दृष्टीस ते कायम पडत राहील.

अभ्यासाची विभागणी करा

मुलांना कधीच एकत्र सर्व विषयांचा अभ्यास करायला लावू नका. मुलांच्या अभ्यासाचे एक वेळापत्रक तयार करा. पाठांतर हे कधीच घोकमपट्टीतून होत नाही. नीट पाठांतर होण्यासाठी कोणताही विषयाचे वाचन, लिहाण आणि त्यावर संवाद झाला पाहिजे. कधीही संकल्पना मुलांना टप्प्याटप्प्याने सांगावी. नाहीतर अभ्यासाचा ताण येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT