Shreya Maskar
पन्हाळेकाजी लेणी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहेत. हा शिल्प कलेचा उत्तम नमुना आहे. येथे हिवाळ्यात आवर्जून भेट द्या.
पन्हाळेकाजी लेणी कोटजाई नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. पन्हाळेकाजी लेण्यांचा समूह २९ लेण्यांचा आहे.
पन्हाळेकाजी लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माचा प्रभाव दिसून येतो . लेण्यांमधील शिल्पे आणि कोरीवकाम सुंदर आहेत.
पन्हाळेकाजी लेण्यांमध्ये गणपती, सरस्वती, त्रिपुरसुंदरी यांसारख्या विविध हिंदू देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
पन्हाळेकाजी लेणीला तुम्ही कुटुंबासोबत पिकनिक प्लान करू शकता. येथे तुम्ही फोटोशूटही करू शकता.
रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने पन्हाळेकाजी लेणीपर्यंत जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.