Shreya Maskar
दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला फिरायला जाण्याचा प्लान करा. नागपूर शहरात फुटाळा तलाव हे एक निसर्गरम्य आणि लोकप्रिय ठिकाण आहे.
फुटाळा तलाव 17 व्या शतकात नागपूरच्या भोसले राजांनी बांधला होता. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे येथे नक्की जा.
नागपूरमधील फुटाळा तलावात संगीत कारंजे पाहायला मिळतात. जे पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. संध्याकाळी येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो.
संध्याकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. हे ठिकाण स्थानिक लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे.
नागपूरमधील फुटाळा तलाव तेलंगखेडी शिव मंदिराच्या जवळ आहे. त्यामुळे देवाच्या दर्शनाला येथे आवर्जून जा.
फुटाळा तलाव तीन बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. चौथी बाजू निसर्गरम्य चौपाटीने सुंदर आहे.
फुटाळा तलाव संध्याकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळतो. तुम्ही येथे फॅमिलीसोबत आवर्जून जा. तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल.
नागपूरमधील फुटाळा तलाव पक्षी निरीक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींनी येथे आवर्जून जा.