Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Shreya Maskar

रत्नागिरी

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गावात गोपाळगड किल्ला आहे. गोपाळगड किल्ल्याला अंजनवेल किल्ला असेही म्हणतात.

Ratnagiri | google

सागरी व्यापार

गोपाळगड सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. गोपाळगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

Fort | google

वशिष्ठी नदी

गोपाळगड किल्ला वाशिष्ठी नदीच्या किनारी एका टेकडीवर आहे. येथे वाशिष्ठी नदीचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fort | google

अरबी समुद्र

गोपाळगड किल्ला अरबी समुद्राचे आणि रत्नागिरी परिसराचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य देतो.

Fort | google

राजवटी

गोपाळगड किल्ला मराठा आणि इंग्रज यांसारख्या विविध राजवटींच्या ताब्यात होता. गोपाळगड किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज आजही मजबूत स्थितीत आहेत.

Fort | google

ट्रेकिंग

गोपाळगड ट्रेकिंगसाठी देखील उत्तम स्पॉट्स आहे. तुम्ही पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर येथे आवर्जून जा. हिवाळ्यात येथे जाणे योग्य राहील.

Trekking | yandex

महादेवाचे मंदिर

गोपाळगड किल्ल्याच्या परिसरात विहीर, महादेवाचे मंदिर आणि दीपस्तंभ आहे. त्यामुळे येथे आल्यावर देवाचे दर्शन नक्की घ्या.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : बॅग भरा अन् ट्रेकला चला, भावंडांसोबत भाऊबीजेला 'येथे' ट्रिप प्लान करा

Maharashtra Tourism | yandex
येथे क्लिक करा...