Shreya Maskar
दिवाळीत भाऊबीजेला भावंडांसोबत धुळे जिल्ह्यात पिकनिक प्लान करा. येथे तुम्ही भन्नाट वीकेंड घालवू शकता. भावंडांसोबत निवांत वेळ मिळेल.
थाळनेर किल्ला हा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात आहे. तुम्ही धुळे येथे उतरल्यावर रिक्षाने किल्ल्यावर जाऊ शकता.
थाळनेर किल्ला हा तापी नदीच्या काठावर असलेला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. नदी काठी तुम्हाला सुंदर वातावरण अनुभवता येईल.
थाळनेर किल्ला हा फारुकी घराण्याची पहिली राजधानी होती. या किल्ल्याचे महत्त्व खान्देशाच्या इतिहासात खूप मोठे होते.
थाळनेरचा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. दगड, चुना आणि शिसे वापरून बांधण्यात आला आहे. याची रचना खूपच आकर्षक आहे.
थाळनेर किल्ल्यावरून तापी नदीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. येथे तुम्ही थोडा निवांत वेळ घालवू शकता. गप्पा गोष्टी करू शकता.
थाळनेर किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय आहे. थाळनेर किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे भावंडांसोबत येथे नक्की जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.