Shreya Maskar
दिवाळीला काही दिवस राहीले आहेत. कमी पैशांत झटपट शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील प्रसिद्ध मार्केट्सना भेट द्या. येथे एकाच ठिकाणी सर्व वस्तू तुम्हाला मिळतील.
दिवाळीत पारंपरिक कपड्यांची शॉपिंग करायची असेल तर तुळशी बागेला भेट द्या. येथे तुम्हाला स्वस्तात मस्त रंगीबेरंगी कपडे पाहायला मिळतील.
दिवाळीत येथे पारंपरिक कपडे, साड्या, ज्वेलरी, दिवे, घर सजावटीच्या वस्तू, पूजा साहित्य सर्व काही मिळते. हे पुण्यातील प्रसिद्ध जुने मार्केट आहे.
सुंदर चप्पल, मिठाई, फराळ यांची खरेदी करायची असेल तर लक्ष्मी रोडला भेट द्या. येथे अनेक दुकाने पाहायला मिळतील. तसेच येथील फराळ चवदार असतो.
दिव्याची सुंदर व्हरायटी येथे पाहायला मिळते. या मार्केटमध्ये दिवाळीत मोठी गर्दी पाहायला मिळते. तुम्ही येथे वीकेंडला जाऊ नका.
घर सजावटीचे सामान घ्यायचे असेल तर जुना बाजार उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला ऑनलाइन मिळतात तशा वस्तू खरेदी करता येतील. तसेच किंमतही कमी असेल.
दिवे, लाइट्स, फुलांच्या माळा, शोपीस, कंदील, तोरणं सर्व काही येथे कमी दरात तुम्हाला मिळेल. त्यामुळे पुण्याला गेल्यावर येथे नक्की जा.
पुण्यातील हाँगकाँग लेन हे एक प्रसिद्ध शॉपिंग डेस्टिनेशन आहे. येथे तरुणाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. येथे ट्रेंडी कपडे मिळतात.