Shreya Maskar
कलंगुट हा गोव्यातील एक अत्यंत लोकप्रिय बीच आहे. जो उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाते.
कलंगुट बीचला 'समुद्रकिनाऱ्यांची राणी' म्हणून ओळखले जाते. कारण हा बीच लोकप्रिय, गजबजलेला असतो. तसेच जगभरातील पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.
कलंगुट बीच जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पॅरासेलिंग, बोटिंग, जेट स्कीइंग आणि इतर अनेक साहसी जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
कलंगुट बीचवर तुम्हाला नाइट लाइफ पाहायला मिळेल. येथे आजूबाजूला रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आहेत. तसेच चवदार ताजे सीफूड खायला मिळते.
कलंगुट बीचला सोनेरी वाळू पाहायला मिळते. तसेच सूर्यास्ताच्या सुंदर नजाऱ्यासोबत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. मित्रांसोबत येथेच पिकनिक प्लान करा.
टिबेटियन मार्केटमध्ये लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, दागिने पाहायला मिळतात. तसेच येथे हस्तकलेच्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. येथे कपडे देखील छान मिळतात.
कलंगुट बीचवर ख्रिसमस आणि न्यू इयरला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील येथे दिवाळीच्या सुट्टीत जाऊ शकता. येथे चार-पाच दिवसांची ट्रिप प्लान कर
मुंबईहून गोव्याला तुम्ही विमान प्रवास करू शकता. गोवा एअरपोर्टवरून तुम्ही टॉक्सीने कलंगुट बीचला पोहचू शकता.
NEXT : दिवाळी अन् किल्ल्यावर भटकंती, अलिबागजवळ वसलंय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण