Shreya Maskar
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत कुटुंबासोबत अलिबागला फिरण्याचा प्लान करा. येथे अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत.
अलिबागला समुद्रसोबतच ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत. जेथे तुम्ही मुलांसोबत पिकनिक प्लान करू शकता. त्यामुळे मुलांना इतिहासाची देखील आठवण होईल.
खुबलढा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ थळ गावात होता. याला 'थळचा किल्ला' असेही म्हणतात. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
खुबलढा किल्ला शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. येथे तुम्हाला आजही चांगले वातावरण पाहायला मिळेल.
खुबलढा किल्ला मजबूत तटबंदीने संरक्षित आहे. खुबलढा किल्ला उंदेरी जलदुर्गावर नजर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो.
खुबलढा किल्ल्यावरून घोसाळगड किल्ला आणि खांदेरी-उंदेरी किल्ला दिसतो. त्यामुळे खुबलढा किल्ला पाहायला आल्यावर या दोन्ही किल्ल्यांना नक्की भेट द्या.
खुबलढा किल्ल्यावरून रायगडचे आणि आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. डोंगर दऱ्या पाहायला मिळतात. तसेच संध्याकाळी देखील निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.