Shreya Maskar
दिवाळीच्या सुट्टीत लाँग वीकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा प्लान करा. येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. जेथे तुम्ही भन्नाट वेळ घालवू शकता.
कात्रज तलाव पुणे शहरात कात्रज घाटाजवळ आहे. हा तलाव पेशवेकालीन असून पूर्वी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरला जात होता.
कात्रज तलावाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा आहे. हा पुतळा तलावाच्या सौंदर्यात भर घालतो.
कात्रज तलावाच्या आजूबाजूला सुंदर परिसर, मुलांसाठी खेळण्याची जागा आहे. मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. उदा. घसरगुंडी,झोके
कात्रज तलाव हे १८ व्या शतकातील पेशवेकालीन तलाव आहे, कात्रज तलावाचे बांधकाम पेशव्यांनी केले आहे. हे विरंगुळ्याचे बेस्ट लोकेशन आहे.
कात्रज तलावाभोवती स्थानिक लोक मॉर्निंग वॉक आणि इवनिंग वॉकसाठी येतात. कात्रज तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
कात्रज तलावाच्या सुंदर परिसरात विविध पक्षी पाहायला मिळतात. ज्यात बदकांचाही समावेश आहे. तुम्ही येथे फोटोशूट देखील करू शकता.
मुंबईहून पुण्याला ट्रेन किंवा प्रायव्हेट गाडीने जाऊ शकता. त्यानंतर पुणे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने कात्रज तलावला जा.