Shreya Maskar
दिवाळीच्या सुट्टीत कोकणाची सफर करा. येथील किल्ल्यांना आवर्जून भेट द्या. येथे भव्य ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतील.
बाणकोट किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
बाणकोट किल्ल्याला हिम्मतगड किल्ला, व्हिक्टोरिया किल्ला या नावाने देखील ओळखले जाते.
सावित्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ एका उंच टेकडीवर बाणकोट किल्ला वसलेला आहे.
व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता.
बाणकोट किल्ल्याला एकूण ८ बुरुज आहेत. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला.
पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून बाणकोट किल्ला जिंकला, आणि त्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो आपल्या ताब्यात घेतला.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.