Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : मुलींना त्यांच्यापेक्षा वयाने मोठे पार्टनर का आवडतात? वाचा खास कारणं

Why Women are Liking Older Man : आता पुन्हा एकदा मुलींनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलांची निवड करण्यास सुरूवात केली आहे. याची काही खास कारणे पुढे पाहू.

Ruchika Jadhav

काळानुसार व्यक्तीची मानसिकता आणि गरजा बदलत असतात. पूर्वीच्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता तसेच त्यांचे लग्न त्यांच्याहून वयाने जास्त मोठ्या व्यक्तीशी केले जायचे. त्यानंतर कायद्यानुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ करण्यात आले. त्यामुळे मुलगा आणि मुलीच्या वयात ३ ते ४ वर्षांच्या अंतराने लग्न होऊ लागले.

मधल्या काळात अनेक कपल समान वयाचे असल्याचं दिसलं. लव्हमॅरेज असल्याने मुलगा आणि मुलगी दोघांचंही वय समान होतं. मात्र समान वय असल्याने अशा जोडप्यांमध्ये समान प्रमाणात बुद्धी, मॅच्युरीटी आणि समान अॅक्टीव्हनेस असतो. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुलींनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलांची निवड करण्यास सुरूवात केली आहे. याची काही खास कारणे पुढे पाहू.

समजदारपणा

आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती समजदार असते. त्यामुळे आपल्या काही चुका झाल्या काही अडचणी आल्या तर पार्टनर आपल्याला समजून घेतो. तसेच अडचणीच्यावेळी आपण दु:खात असताना समजदार पार्टनर आपलं रक्षण करतो. तेच समान वयाचा पार्टनर तितका समजदार नसतो, तो आपल्याच चुका काढत राहतो, त्यामुळे मुली आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पार्टनरची निवड करतात.

सिरीअसनेस

प्रत्येक मुलीला सेफ लाइफ हवी असते. त्यासाठी त्या वयाने मोठ्या व्यक्तीची निवड करतात. आपला पार्टनर पूर्ण वेळ फक्त मजाक, मस्ती करणारा नसावा असं मुलींना वाटतं. त्यामुळे त्या कायम मोठ्या आणि सिरीअसनेस असलेल्या व्यक्तीच्या शोधात असतात. वयाने मोठ्या मुलांचं सेन्सऑफ ह्युमर देखील चांगलं असतं. त्यामुळे मुली अशा पार्टनरची निवड करतात.

आत्मविश्वास

वयानुसार प्रत्येक कामात आपला आत्मविश्वास देखील वाढतो. मुलींना कायम सक्सेस आणि पुढे जाणं आवडतं. त्यासाठी त्यांना आत्मविश्वास चांगल्या असलेल्या व्यक्ती हव्या असतात. अडचणी आणि कठीण काळात पार्टनरचा आत्मविश्वास चांगला असल्यास तो आपल्याला देखील संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल असं सर्व मुलींना वाटतं. त्यामुळे त्या वयाने मोठ्या पार्टनरची निवड करतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

SCROLL FOR NEXT