Relationship Tips, Try 5 Things Before Ending Relationship  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

Try 5 Things Before Ending Relationship : नात्यात फक्त प्रेम नाही तर तितकाच समजूतदारपणा देखील असायला हवा. प्रत्येक नात्यात चढ-उतारपणा येतो. अनेकदा काही कारणांमुळे नात्यात वाद होतात. परंतु, या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या बनत जातात.

कोमल दामुद्रे

Avoid 5 Mistake Before Break Up :

नात्यात फक्त प्रेम नाही तर तितकाच समजूतदारपणा देखील असायला हवा. प्रत्येक नात्यात चढ-उतारपणा येतो. अनेकदा काही कारणांमुळे नात्यात वाद होतात. परंतु, या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या बनत जातात.

रोजच्या भांडणांनी कंटाळा येतो. अशावेळी आपण नाते (Relationship) संपवण्याचा विचार करतो. जोडीदारापैकी (partner) एकजण पुन्हा आपल्याकडे संधी मागतो परंतु, अशावेळी नेमके काय करावे हे आपल्याला सुचत नाही. जर तुमचा पार्टनर देखील सतत भांडण करत असेल आणि ब्रेकअपविषयी बोलत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा.

1. नात्याला संधी देऊ शकता का?

सगळ्यात आधी हे जाणून घ्या की, तुमच्या नात्यात सुधारणा होण्यासाठी खरेच वाव आहे का? प्रत्येक नात्यात संघर्ष करावा लागतो. त्यासाठी एकमेकांना थोड वेळ द्या. आपल्या नात्याला पुन्हा संधी द्यावी का याचा विचार करा.

2. स्वत:ला समजून घ्या

आपल्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपल्याशिवाय चांगले कुणीही समजू शकत नाही. नातं तुटताना ते वाचवण्यासाठी स्वत:शी बोला. तसेच नात्यात राहणे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा विचारही करा.

3. संवाद महत्त्वाचा

जर तुमच्या नात्यात दूरावा आला असेल तर एकमेकांशी संवाद साधा. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकमेकांना विचारा. समस्येवर मनमोकळेपणाने बोला. जोडीदाराची कोणती समस्या आहे किंवा त्याला तुमच्याकडून काय हवे आहे हे विचारा.

4. प्रयत्न

अनेक छोट्या छोट्या चुकांमुळे नात्यावर परिणाम होतो. त्यासाठी जोडीदाराच्या इच्छेचा मान राखा. नाते वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आपला पार्टनर खुश कसा राहिल यावर लक्ष द्या.

5. सकारात्मक गोष्टी

नाती कमकुवत होण्याचे एकमेव कारण म्हणजे नकारात्मकता. आपण चुकलो आहोत ही गोष्टी कधीही न स्वीकारणे. त्याचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करा. ज्यामुळे नात्यातील दूरावा कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट; समस्या सोडवण्याचे आश्वासन

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT