Relationship Tips Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा! वैवाहिक जीवन होईल सुखी, नात्यात कधीच येणार नाही अडचण

Secrets Of Happy Married Life : नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुमचे देखील नुकतेच लग्न झाले असेल तर जोडप्यांनी या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमच्या नात्यात कधीच दूरावा येणार नाही.

कोमल दामुद्रे

Married Life Tips :

लग्न हे दोन व्यक्तींचे नसून ते दोन कुटुंबांचे असते. लग्न हे दोन व्यक्तींना बांधणारे पवित्र बंधन मानले जाते. प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास कायम टिकवण्यासाठी अनेक जोडपी प्रयत्न करत असतात.

नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुमचे देखील नुकतेच लग्न झाले असेल तर जोडप्यांनी या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमच्या नात्यात कधीच दूरावा येणार नाही.

1. समस्या समजून घ्या

सुखी वैवाहिक (Marriage) नात्यात पती-पत्नीला त्यांच्या आनंदासोबत एकमेकांचे दु:ख कसे वाटून घ्यावे हे माहित असते. तसेच तुमचा जोडीदार (Partner) कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे माहित करुन घ्या. जर तुम्हाला त्याच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांना मानसिक पाठींबा द्या.

2. स्पेस महत्त्वाची

तुमच्या वैवाहिक नात्यातील आनंद हरवू नये असे वाटत असेल तर नात्यात स्पेस देण जास्त महत्त्वाचे आहे. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज्ड मॅरेज दोन्ही वेळी नात्यात एकमेकांना तडजोड करावी लागते. जर तुम्ही काही कारणांमुळे जोडीदारावर नियंत्रण आणत असाल तर तो तुमच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात करेल.

3. विश्वास ठेवा

कोणत्याही नात्यात (Relation) सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणत्याही सुखी आणि वैवाहिक नात्यात जोडप्यांमधील विश्वास हा अधिक महत्त्वाचा असतो. नात्यात अनेकदा चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अशावेळी एकमेकांचा विश्वास गमावू नका.

4. आवडी-निवडी लक्षात ठेवा

पती-पत्नींने एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजे. यामध्ये जोडीदाराच्या खाण्यापासून ते त्याला अधिक कोणत्या गोष्टी आवडतात हे पाहा. ज्यामुळे तुम्ही एकमेंकाना अधिक समजून घेता येईल. त्यामुळे वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT