Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : या ३ गोष्टी करणाऱ्या पुरुषांवर महिला असतात नेहमी फिदा, कधीच होत नाही दु:खी

Secrets Of Happy Relationship : नातं कोणतही असो, त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणे अधिक गरजेचे आहे. कॉलेज, ऑफिस किंवा डेटिंग अॅप्सवर हल्ली सहज नाती जुळतात. परंतु, अनेकदा नात्यात दुराव्याचा देखील सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Married Life Tips :

नातं कोणतही असो, त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणे अधिक गरजेचे आहे. कॉलेज, ऑफिस किंवा डेटिंग अॅप्सवर हल्ली सहज नाती जुळतात. परंतु, अनेकदा नात्यात दुराव्याचा देखील सामना करावा लागतो.

प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास कायम टिकवण्यासाठी अनेक जोडपी प्रयत्न करतात. नातं अधिक घट्ट करण्यासाठी त्यात प्रेम पुरेसे नसून त्यात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही देखील नुकतेच रिलेशनमध्ये (Relation) आले असाल तर या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

बरेचदा आपला जोडीदार (Partner) आपल्या वागण्यामुळे दु:खी होतो. जर तुम्ही तुमच्या महिला जोडीदाराला योग्य वेळी समजून घेतले नाही तर त्या नेहमीच दु:खी राहातात. म्हणून पुरुष सहसा आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु,अपयश येते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी

1. मदत करणे

जर तुम्ही नात्यात असाल तर तुमच्या स्त्री जोडीदाराला कामात थोडीशी मदत करायला हवी. ज्यामुळे त्यांच्या कामाचा भार थोडा हलका होईल. तसेच त्या नेहमी आनंदी राहू शकतात.

2. प्रेम व्यक्त करणे

बरेच पुरुष त्यांचा कामाचा राग आपल्या जोडीदारावर काढतात. त्यांचे प्रेम व्यक्त करताना ते अनेकदा विचार करतता. ही चुक वेळीच सुधारायला हवी. जर तुम्ही वेळोवेळी तुमचे प्रेम व्यक्त केले तर नात्यात दूरावा येणार नाही.

3. वेळ घालवा

कामाच्या गडबडीमुळे आपल्याला जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यासाठी एकांतात वेळ घालवण्यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवे. जोडीदाराचा दिवस कसा होतो हे जाणून घ्या. त्यांच्या समस्या आणि चिंता समजून घ्या. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT