Relationship tips for couples : लैंगिक संबंध हा प्रत्येक नात्यातील महत्त्वाचा पैलू आहे. बरेचदा नात्यात प्रेम असते पण शरीर संबंध ठेवल्यानंतर काही चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की तणाव लैंगिक कार्यक्षमता आणि शुक्राणूंच्या आरोग्यास (Health) हानी पोहोचवू शकतो, ज्यामुळे वंध्यत्वाची शक्यता वाढते.
अभ्यासात असे आढळून आले की, ज्या पुरुषांमध्ये तणावाची पातळी जास्त असते त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी आणि शुक्राणूंची गतिशीलता कमी होण्याची शक्यता असते.
याशिवाय, तणावामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते, असेही आढळून आले. तसेच, अभ्यासाने वंध्यत्वाच्या समस्यांना देखील बळी पडण्याचे एक कारण मानू शकतो. उत्तम लैंगिक जीवन जगण्यासाठी तणाव पातळी कमी करण्यासाठी काही काळजी आपण घ्यायला हवी. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल
1. चालणे -
तणावाला कमी करण्यासाठी नियमितपणे सकाळी चालल्यास फायदा होईल. यामध्ये शारीरिक क्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी चालणे शरीर सक्रिय राहण्यास मदत करते. नवीन लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आनंद घेणे आणि फिरण्यासाठी ताज्या हवेत श्वास घेणे यामुळे आपल्या तणावाची पातळी कमी होऊ शकते.
2. योगाभ्यास करा
योग हा अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपचार आहे. अनेक योगासने आणि आसने आपल्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचे परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. डोक्याच्या स्थितीत ही आसने केल्याने आपल्याला शांत राहण्यास मदत होते आणि आपल्या मज्जासंस्थेला देखील आराम मिळतो.
3. व्यक्त व्हा
रागाच्या किंवा दुःखाच्या वेळी आपल्या तुमच्या भावना शेअर करणे महत्त्वाचे आहे. आपले दुःख आणि राग दीर्घकाळ धरून ठेवल्याने तणावाची (Stress) पातळी वाढते ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते.
4. मंद श्वास आणि ध्यान
आपल्याला अधिक राग आल्यास शांत व्हा ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. ज्यामुळे तुमच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सहनशीलता वाढेल. हे निर्णय घेण्यास सुलभ करते आणि तणाव कमी करते.
5. दैनंदिन जीवनात योग्य आहाराचा समावेश करा
तणावाची पातळी कमी ठेवण्यासाठी चांगले पोषण आणि संतुलित आहार आवश्यक आहे. बर्याचदा तणावाच्या काळात आपल्याला गोड खाण्याची इच्छा असते. पण ते एका मर्यादेतच सेवन केले पाहिजे. तणावाच्या काळात शांत राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे चांगले. तसेच एखादे चांगले संगीत तणावमुक्त करण्यासाठी आरामदायी आहे. पुरेशी झोप घ्या दररोज रात्री आठ तासांची झोप घ्या. झोप हा सर्वोत्तम उपाय आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.