Manasvi Choudhary
बाजारातून फळे आणि भाज्या आणल्यानंतर त्या आपण फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र काही दिवसांतच या भाज्या आणि फळे खराब होतात.
फ्रिजमधील फळे आणि भाज्या खराब होण्यामागचे कारण म्हणजे साठवून ठेवण्याची पद्धत
फ्रिजमध्ये फळे आणि भाज्या जर तुम्ही एकत्र ठेवत असाल तर ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. यामुळे फ्रिजमध्ये फळे आणि भाज्या एकत्र ठेवाव्या की नाही असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.
फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये एकत्र ठेवल्यास त्या लवकर खराब होतात.फळे आणि भाज्या एकाच ठिकाणी ठेवल्याने त्यांचा ताजेपणा कमी होऊ शकतो.
केळी, संत्री, सफरचंद, टरबूज आणि पपई या फळांमधून 'इथिलीन' नावाचा नैसर्गिक वायू बाहेर असतो. जो फळांना पिकवण्यास मदत करतो. परंतु, जेव्हा तुम्ही ही फळे पालेभाज्या किंवा इतर भाज्यांच्या जवळ ठेवता, तेव्हा या वायूमुळे भाज्या खूप लवकर पिकतात, पिवळ्या पडतात आणि कुजायला लागतात.
फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिडेशन प्रक्रिया वेगवेगळी असते. फळांमधून निघणारा ओलावा भाज्यांवर जमा होतो, ज्यामुळे भाज्यांवर बुरशी ( किंवा जंतू वाढण्याची शक्यता झपाट्याने वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.