Relationship Tips for Couples Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्न करण्याचा विचार करताय? जोडीदाराला अवश्य विचारा हे ४ प्रश्न

Discuss These 4 Things With Partner Before Marriage : तुम्ही निवडलेला जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे का हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Relationship Tips in Marathi:

हल्ली लिव्ह इन रिलेशनशीपचा ट्रेंड आपल्या नात्यात पाहायला मिळतो. कित्येक वर्ष एकाच नात्यात राहून लग्न करण्याच्या निर्णयावर आपण अधिक विचार करतो. नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर नातं अगदी कोणत्याही वयात टिकू शकते.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करताना किंवा जोडीदार निवडताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. अशावेळी काही गोष्टींवर विचार करायला हवा. जोडीदाराशी चर्चा करायला हवी. तुम्ही निवडलेला जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे का हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लग्न करण्यापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. उत्पन्न आणि खर्च

नात्यात पैशांविषयी (Money) बोलणे खरेतर चुकीचे असते. परंतु, भविष्यासाठी या गोष्टींवर चर्चा करणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी लग्न करण्यापूर्वी या गोष्टींवर मनमोकळेपणाने बोला. त्याचे उत्पन्न आणि खर्चाविषयी सविस्तर चर्चा करा

2. मुलांविषयी

तुमच्या फॅमिली प्लानिंगविषयी देखील चर्चा करा. भावी जोडीदाराशी (Partner) याविषयी विचारपूस करा. लग्न झाल्यानंतर कोणत्या वयात मुलं हवे आहे. यासंबंधित बोलणे गरजेचे आहे.

3. लग्नानंतर आई-वडील हवे की नको?

जर तुमच्या कुटुंबात (Family) मतभेद असतील किंवा तुमच्या जोडीदाराला आई-वडिलांसोबत राहायचे नसेल तर आधीच याबाबत विचारा. त्यामुळे तुम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या तयार व्हाल. परंतु, आई-वडिलांच्या उतार वयात आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. तुमची ती जबाबदारी आहे हे समजून घ्या.

4. करिअर

लग्न झाल्यानंतर अनेक मुली नोकरी सोडतात. याविषयी जोडीदाराला पूर्व कल्पना द्या. तसेच कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास त्याविषयी देखील चर्चा करा. सर्व मुद्दयांवर लग्नाआधी एकमत व्हायला हवे. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT