Relationship Tips: या कारणांमुळे येतो पती-पत्नीच्या नात्यात दूरावा, बोलण्याआधी विचार कराच!

How To keep Relationship Strong Between Husband wife : नवरा-बायकोचे नातं हे सर्वात सुंदर समजलं जा. या नात्यापासूनच इतर नात्यांची सुरुवात होते.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

Husband Wife Relationship :

वैवाहिक नातं आनंदी, सुखी-समाधानी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. त्या नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर ते नातं अगदी कोणत्याही वयात टिकू शकते. नवरा-बायकोचे नातं हे सर्वात सुंदर समजलं जा. या नात्यापासूनच इतर नात्यांची सुरुवात होते.

अनेक वेळा आपले आपल्या पार्टनरशी मतभेद होतात. ज्यामुळे नात्यात दूरावा येऊ लागतो. परंतु, कधी कधी हा दूरावा असाहय्य होतो. त्यामुळे नातं तुटण्याची वेळ येते. परिस्थिती पाहून तुम्ही तुमच्या नात्यातील आवश्यक तेवढी भांडण कमी करु शकता. तसेच तुमच्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी सांगणे टाळायला हवे हे जाणून घ्या.

Relationship Tips
Chanakya Niti On Relationship : या कारणांमुळे होतोय घटस्फोट, चाणक्यांनी दिला नातं टिकवण्यासाठी सल्ला

1. लग्न केल्यामुळे पश्चाताप होतो

बरेचदा लग्न (Marriage) झाल्यानंतर आपण भांडणात जोडीदाराला तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होते असे वारंवार सांगतो. यामुळे नात्यात दूरावा येतो. समोरच्याला या गोष्टीची खंत वाटू लागते. नात्यातील प्रेम (Love) कमी होतेच पण जोडीदाराचा विश्वासही कमी होतो.

2. तुलना नको

कोणत्याही भांडणात कधीही जोडीदारांने पालकांसोबत तुलना करु नये. हे नात्यासाठी (Relation) खूप वाईट आहे. यामुळे नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुम्हाला जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टींचा राग आला असेल तर स्पष्टपणे बोला

3. चुकीच्या इच्छा

कामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर माझ्या लग्न दुसऱ्यांशी झालं असते तर बरं झालं असते असे सतत बोलून दाखवू नका. माझ्यासाठी तुला वेळच नाही. अशा गोष्टींमुळे पार्टनर दु:खावला जाऊ शकतो. ज्यामुळे नात्यात दूरावा येऊ शकतो.

Relationship Tips
Happy Life Tips: दु:खातही आनंदी राहाण्याची गुरुकिल्ली! या सोप्या टिप्स फॉलो करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com