Relationship Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : नात्यात येण्यापूर्वी या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा येईल दूरावा

Couple Tips : नुकतेच नात्यात आल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही अधिक उत्सुक असतात. जोडीदाराचा प्रेमळ आणि काळजीपूर्वक स्वभाव पाहून हाच आपला भावी जोडीदार असेल अशी आपण आशा व्यक्त करतो.

कोमल दामुद्रे

Mistake Avoid In A New Relationship :

नातं घट्ट करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नसते तर त्यात विश्वास, आपुलकी देखील तितकीच महत्त्वाची आहे. नवीन नात्यात आल्यानंतर आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्याचा आपल्या नात्यावर परिणाम होतो.

नुकतेच नात्यात आल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही अधिक उत्सुक असतात. जोडीदाराचा प्रेमळ आणि काळजीपूर्वक स्वभाव पाहून हाच आपला भावी जोडीदार असेल अशी आपण आशा व्यक्त करतो. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करायला छान वाटतं परंतु, कधी कधी ही अतिघाई आपल्या नात्यासाठी चांगली नसते.

नवीन नात्यात आल्यानंतर नात्याला (Relation) थोडा वेळ देणे देखील गरजेचे आहे. समोरच्याचे गुण-दोष आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही देखील नुकतेच रिलेशनशीपमध्ये आले असाल तर या चुका करु नका.

1. प्रेम व्यक्त करण्याची घाई

डेटिंग अॅप्सच्या काळात तुम्हाला अनेकांना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. या काळात तुम्हाला अनेक चांगली माणसे मिळतील तर त्यात काही अनोळखी देखील असतील. यासाठी तुम्ही समोरच्याला ओळखा, त्याच्या आवडीनिवडी पाहा आणि मग त्याच्यावरचे प्रेम तुम्ही व्यक्त करा.

2. वैयक्तिक माहिती नको

नात्यात विश्वास आल्यानंतर अनेकदा आपण आपली वैयक्तिक माहिती शेअर करतो. पण असे करणे चुकीचे आहे. पण यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्या नात्याशी किती गंभीर आहे हे कळेल. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी (Benefits) तुमचा गैरवापर करु शकतो.

3. सोशल मीडिया

जोडीदाराला (Partner) पाठिंबा देण्यासाठी तुम्ही अनेकदा तुमचे सोशल मीडिया आणि आर्थिक गोष्टी शेअर करत असाल तर वेळीच थांबा. अनेक वेळा समोरची व्यक्ती याचा गैरवापर करतात. त्यासाठी आर्थिक गोष्टी स्वत:पूरता मर्यादित ठेवा. तुमच्या सोशल मीडियाबाबतच्या गोष्टी देखील शेअर करु नका.

4. लग्नाची घाई नको

रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी लग्नाची स्वप्ने पाहू नका. कोणत्याही व्यक्तीला डेट करताना ती व्यक्ती आपली जोडीदार नसते. यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या सोबत वेळ घालवा ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

Menstrual Care: मासिक पाळीच्या वेळी स्तन दुखतात? जाणून घ्या यामागील हार्मोनल बदल आणि उपाय

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

SCROLL FOR NEXT