How To Express Feelings 
लाईफस्टाईल

Relationship: मनातील भावना ओठांवर येत नाहीत? 'या' टिप्स करा फॉलो सहज व्यक्त कराल Feelings

How To Express Feelings: तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसमोरही व्यक्त होऊ शकत नसाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

Bharat Jadhav

तुमच्या भावना व्यक्त करणे सोपे नसते, खासकरून जेव्हा तुमच्या मनात एखाद्याबद्दल काही विशेष भावना असते. आपल्या भावना समोरील व्यक्तीला सांगण्याच्या किंवा त्याच्यासमोर व्यक्त करण्याची एक पद्धत असते. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनातील भावना सांगितल्यानंतर समोरील व्यक्ती तुमच्यावर कधीच रागवत नाही. पण कधी-कधी आपण अतिविचार करत असतो, त्यामुळे मनातील भावना सांगणं कठीण होऊन जातं. पण प्रत्यक्षात व्यक्त होणं हे काही आव्हानात्मक काम नाही. हो, भावना सहजपणे तुम्ही समोरील व्यक्तीला सांगू शकतात, त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

वेळ गमावू नका

अनेकदा लोक योग्य वेळेची वाट पाहत असतात, पण योग्य वेळ कधीच येत नाही. तुम्हाला तुमच्या भावना कोणाशी तरी शेअर करायच्या असतील तर उशीर करू नका. समोरील व्यक्तीला तुमच्या मनात त्याच्याविषयी काय भावना आहेत, हे सांगण्यासाठी एक शांत आणि खासगी जागा निवडा. तेथे त्यांना शांतपणे तुमच्या मनातील भावना सांगा.

खूप विचार करू नका

तुमच्या भावना व्यक्त करण्यापूर्वी खूप विचार केल्याने तुम्हाला शंका येऊ शकते. तुमच्या मनाचे ऐका आणि तुमच्या मनाचे बोला. आपले मत स्पष्टपणे आणि आदराने व्यक्त करणे महत्वाचं आहे. त्यामुळे जास्त विचार करत बसल्याने हातातील संधी निघून जाईल. तुमच्या मनात जे काही ते स्पष्ट आणि बेधडकपणे बोला.

अपेक्षा ठेवणं चुकीचं

तुम्ही तुमच्या मनातील भावना सांगितल्यानंतर समोरील व्यक्ती रागवेल किंवा ती व्यक्ती हो म्हणणार नाही. नाही म्हणेल मग काय करायचं अशा विचाराने आपण आपल्या मनात अपेक्षा वाढवत असतो. त्यामुळे मनात अपेक्षांचा बोझ वाढवू नका.

दोष देऊ नका

तुमच्या भावना व्यक्त करताना समोरच्याला दोष देऊ नका. तुमच्या भावना "मी" शब्दात व्यक्त करा. उदाहरणार्थ, "मला असे वाटते..." ऐवजी " तुमच्या त्या गोष्टीमुळे मला असं वाटत आहे, असं म्हणणे चुकीचे आहे.

आग्रह करू नका

तुमच्या भावना व्यक्त करताना समोरच्या व्यक्तीवर दबाव आणू नका. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी वेळ द्या. जर ते तयार नसतील तर त्यांना वेळ द्या आणि त्याचा आदर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

SCROLL FOR NEXT