Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Ruchika Jadhav

पती-पत्नी म्हणजे संसाराच्या गाड्याची दोन चाके. यातील एक चाक जरी नसले तरी व्यक्तीच्या आयुष्यात दुख:चा डोंगर कोसळतो. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पती-पत्नीच्या नात्याला ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. पती-पत्नीमध्ये विचारांमध्ये बराच फरक असतो. त्यामुळे काही ना काही कारणावरून मतभेद होतात आणि पुढे याचं रुपांतर भांडणात होतं.

पती-पत्नीच्या नात्यात होणाऱ्या वादामुळे व्यक्ती त्रस्त होतात. भांडण एकदा दोनदा झाले तर ठीक आहे. मात्र काही काळानंतर एक वेळ अशी येते की नात्यत सुख कमी आणि दु:ख जास्त वाटू लागतं. शेवटी आपलं हे नातं तुटण्याची भीती जोडप्यांना वाटू लागते. नातं तुटण्याची भावना आणि प्रसंग प्रत्येकासाठी प्रचंड वेदनादायी असतो. त्यामुळे तुमच्यावर देखील अशी वेळ येऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

बोलण्याआधी विचार करा

काही कारणावरून वाद आणि भांडणे झाल्यास किंवा तुम्हाला पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नाही तर काही बोलण्याआधी विचार करा. विचार केल्यानंतरच बोलण्यास सुरुवात करा. अनेकदा आपण जास्त रागात येतो आणि आपण पार्टनरला उलट सुलट बोलतो. आपण रागात बोलून जातो. मात्र असे केल्याने आपल्या पार्टनरच्या मनात आपले शब्द आहेत तसेच राहतात आणि त्यांना याचा फार त्रास होतो.

गोष्टी मनात दाबून ठेवू नका

काही वेळा असं होतं की आपल्या पार्टनरच्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष केल्याने पार्टनरला आपल्या मनात काय सुरु आहे हे समजत नाही. तसेच वेगळ्या एखाद्या मुद्द्यावरून वाद झाल्यावर आधीचे विषय सुद्धा आवडतात आणि मनात असलेली खदखद मोठ्याने बाहेर येते. त्यामुळे आपण आणखी जास्त राग व्यक्त करतो. असे होऊ नये यासाठी कायम आपल्या पार्टनरला न पटलेल्या गोष्टी समजावून आणि शांतपणे सांगा.

पार्टनरशी भांडून झोपू नका

काही झालं तरी इतर नात्यांपेक्षा पती-पत्नीचं नातं खास आणि फार अनोखं असतं. त्यामुळे या नात्यात दरी पडू न देणे आपल्याच हातात असते. पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर भांडण झाल्यावर आपण तसेच झोपल्यास डोक्यात सतत तेच विषय फिरत राहतात. त्याने झोप लागत नाही, याचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे पार्टनरशी भांडून झोपू नका. भांडण झाल्यास त्यावर काहीतरी मार्ग काढा आणि मग झोपा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT