Vastu Tips : तुमच्या बेडरूममध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' गोष्टी; पती-पत्नीच्या नात्यात येईल दुरावा

Vastu Tips For Bedroom: वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम आहे. त्याप्रमाणे बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो.
bedroom vastu tips
bedroom vastu tipsGOOGLE
Published On

प्रत्येक वास्तूचं एक शास्त्र असतं. या शास्तानुसार, आपल्याला घराची ठेवणं ठेवावी लागते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही शक्ती असते, असं मानलं जातं. ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या व्यक्तीवरही पडतो.

वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम आहे. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमसाठीही काही खास नियम बनवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो. तुमच्या घरातील बेडरूम वास्तूशास्त्रानुसार कसं असलं पाहिजे ते पाहूया.

bedroom vastu tips
Foods for constipation: जोर लावूनही शौचाला होत नाही; किचनमधील ४ पदार्थांनी हे दुखणं होईल कायमचं बंद

घरातील बेडरूम वास्तू शास्त्रानुसार कसं असलं पाहिजे

प्राण्यांचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार, आक्रमक प्राण्यांचे फोटो तसंच एखाद्या युद्धाचा फोटो तुमच्या बेडरूममध्ये ठेऊ नका. त्याचप्रमामे दुःखी चेहऱ्याचे फोटो बेडरूममध्ये अजिबात ठेवू नका. त्याचा मनावर वाईट परिणाम होतो.

काटेरी रोप

वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या बेडरूममध्ये काटेरी झाडं चुकूनही लावू नका. त्यापेक्षा अपराजिताचं रोप लावणं शास्त्रानुसार फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही तुमच्या खिडकीच्या जवळ हे झाडं लावू शकता. यामुळे दाम्पत्यामध्ये प्रेम वाढतं.

bedroom vastu tips
Coronary Artery Blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याच्या काही दिवस अगोदर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या, अन्यथा...

उत्तर-पश्चिम दिशा

वास्तुशास्त्रानुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बेडरूम हे घराच्या उत्तर किंवा वायव्य दिशेला असली पाहिजे. यामुळे पती-पत्नीचे नातं मजबूत होतं, असं मानलं जातं.

झऱ्याचा फोटो

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या बेडरूममध्ये धबधब्याचे किंवा पाण्याचे फोटो असेल तर तो लगेच काढून टाकाणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. असे फोचो बेडरूमसाठी चांगले मानले जात नाहीत. शास्त्रानुसार, हे फोटो पती-पत्नीच्या नात्यात तेढ निर्माण करतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com