Relationship Tips: विवाहित पुरुषांनी चुकूनही करू नये 'अशी' कामं; पत्नीसोबतचं आयुष्य होईल बर्बाद

Husband-Wife Relation: पतीच्या या सवयींमुळे पत्नी चिडचिड करते आणि त्याचा परिणाम दोघांच्या नात्यावर होतो. अशावेळी पुरुषांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते पाहूयात.
Husband-Wife Relation
Husband-Wife Relationsaam tv
Published On

रिलेशनशिप असो किंवा लग्न...मुळात कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नातं टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्तींकडून पुरेसे प्रयत्न असावे लागतात. जर कोणा एका व्यक्तीकडून नात्यासाठी कमी असेल तर नातं तुटण्याची अधिक भीती असते.

लग्नाच्या बंधनामध्ये कोणत्याही बाबतीत दोन्ही पार्टनर्सची समान जबाबदारी असते. मात्र अनेकदा पतीच्या काही गोष्टी किंवा सवयी अशा असतात, ज्या पत्नीला पटत नाहीत. पतीच्या या सवयींमुळे पत्नी चिडचिड करते आणि त्याचा परिणाम दोघांच्या नात्यावर होतो. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या पुरुषांनी टाळल्या पाहिजेत.

Husband-Wife Relation
Newly Wed Bride: सासरी पाऊल ठेवताच नव्या सूनेकडून कधीच ठेऊ नयेत 'या' अपेक्षा; घरात होऊ शकतो मोठा कलह

घरातील कामामध्ये मदत न करणं

जी घरातील कामं असतात ती सामान्यपणे महिलाच असतात. मग त्यामध्ये भांडी घासणं, कपडे धुणं किंवा घर साफ करणं या कामांमध्ये पतीचा समावेश जास्त नसतो. अशावेळी सर्व कामांची जबाबदारी केवळ महिलांवर येतं. महिलांना पुरुषांची ही गोष्ट आवडत नाही.

कमी प्रमाणात इमोशनल सपोर्ट

जर पुरुष कमी इमोशनल किंवा इनसेंसिटिव असेल तर ही गोष्ट महिलांना आवडू शकत नाही. जेव्हा पती पत्नीच्या भावना आणि समस्या समजून घेण्यास समर्थन असतो तेव्हा पत्नीला एकटं वाटू शकतं. त्यामुळे पतीची ही गोष्ट महिलांना आवडत नाही.

सर्वांसमोर महिलांवर ओरडणं

पत्नीच्या सवयी, स्वयंपाकाचं कौतुक तसंच तिच्या आवडी-निवडींवर टीका करणं त्यांना आवड नाही. जर पती त्यांच्या पत्नीबद्दल सतत वाईट बोलत असेल किंवा तिच्या उणीवा सर्वांसमोर दाखवत असेल तर पत्नीच्या स्वाभिमानावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पतीने टीका करण्याऐवजी सकारात्मक संवाद साधणं फायदेशीर ठरणार आहे.

पत्नीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणं

आपली देखील काळजी घ्यावी, असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. मात्र अनेकदा महिलाच्या समस्या आणि छोट्या-छोट्या गोष्टी पुरुष टाळतात. मात्र असं करणं पत्नीला अजिबात आवडत नाही. नवरा-बायकोच्या नात्याला मजबूत ठेवण्यासाठी पतीने ही सवय सोडून द्यावी.

Husband-Wife Relation
Toxic Men: टॉक्सिक पुरुषांकडे का महिला अधिक आकर्षित होतात? 'ही' आहेत कारणं

पर्सनल स्पेसकडे दुर्लक्ष करणं

प्रत्येक व्यक्तीची एक पर्सनल स्पेस असते आणि प्रत्येकाला त्याची गरज असते. पती आपल्या पत्नीच्या 'मी टाइम'मध्ये वारंवार हस्तक्षेप करत असेल तर यामुळे पत्नीला चीड येणं स्वाभाविक आहे. अशावेळी पतीने हे समजून घेतले पाहिजे की पत्नीचा पर्सनल स्पेस देणं महत्त्वाचं आहे.

टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com