Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

Fire In Building : सिद्धार्थ कॉलनीत एका 3 मजली इमारतीला आग लागली. यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ कॉलनीत एका 3 मजली इमारतीला रविवारी पहाटे आग लागली, त्यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी कुटुंबियांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एका 3 मजली इमारतीला आग लागली, रविवारी पहाटे घटना घडली. त्यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तळमजल्यावर बांधलेल्या दुकानाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली, मात्र तेथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी याठिकाणी भेट दिली असून कुटुंबीयांना 5 लाखांची मदत घोषित केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com