Reels Side Effects  Saam TV
लाईफस्टाईल

Reels Side Effects : रील्सचा नाद नको रे बाबा! आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम

Shweta Bhalekar

हातात फोन घेतला की इन्स्टा, फेसबुक नाहीतर युट्यूबवर स्क्रोल करत गरजेच्या असलेल्या नसलेल्या सर्वच रील्स बघत तास कधी जातो, कळत नाही. हल्ली वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करणारे सोशल मीडियावर 30 सेकंद रील म्हणून पाहायला जातात आणि जाळ्यात फसतात. फसतात अशासाठी म्हटलं कारण काहींना याचं व्यसन लागतं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मिळणारा बहुपयोगी वेळ रील्सच्या नादापायी व्यर्थ जातो. मुद्दा इतकाच नाही, तर या व्यसनाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.

सतत रील्स पाहण्याचे दुष्परिणाम कोणते ?

थोडा वेळ काही रील्स पाहत आहात तर ठीक पण सलग एका मागून एक रील्स पाहणं घातक आहे. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सोशल मीडिया हे आभासी जग पण त्यात मन रमू लागतं. तेच खरं वाटू लागतं. त्यामुळे खऱ्या जगाशी, आजूबाजूच्या लोकांशी संपर्क तुटतो. घरातल्या लोकांशी, मित्र - मैत्रिणीशी संवाद कमी होतो. एकटेपणा आवडू लागतो. आभासी दुनियेत मन रमू लागतं. त्यातली प्रत्येक गोष्ट खरी वाटू लागते.

त्यामुळे स्वतःशी कळत नकळत तुलना होऊ लागते. त्यातून चिडचिड वाढते. तासनतास रील्स पाहिल्याने स्मरणशक्ती कमकुवत होते. विविध विषयांवर रील्स असतात त्यामुळे काही सेकंदामध्येच भावना बदलत जातात याचा मनावर परिणाम होतो. मेंदूही थकतो त्यामुळे एकाग्रता भंग पावते. अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे गोंधळ उडतो. डोळ्यांवर ताण येतो. हाताची बोटं आणि मान यावरही एका विशिष्ट अवस्थेत फार वेळ बसल्याने गंभीर परिणाम होतात. अनेक वेळा निद्रानाशाची समस्या उद्भवते. त्यामुळे मनोरंजन हवं म्हणून वेळेचा असा अपव्यय नको. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.

रील्सच्या चक्रव्युहातून कसं सुटायचं ?

* सकाळी उठताच हातात फोन घेऊ नका.

* कामानिमित्त घेतलाच तर इंस्टा, फेसबुकसारख्या अॅपवर जाणं कटाक्षाने टाळा.

* सोशल मीडिया अॅपवर वेळेची मर्यादा लावा.

* किती वेळ सोशल मीडियावर घालवला, हे तपासण्यासाठी अॅप आहेत, त्यांचा वापर करा.

* विविध अॅप्सचे नोटिफिकेशन बंद ठेवा.

* करमणुकीसाठी रील्स पाहण्यापेक्षा इतर गोष्टींचा अवलंब करा.

* चालायला जा. सायकलिंग करा, ट्रेकला जा.

* नदी, समुद्र, डोंगरदऱ्यात फिरा.

* वाचाल तर वाचाल म्हणून पुस्तकं वाचा.

* छंद जोपासा. चित्र काढा, हस्तकला करा. तबला, गिटार किंवा कुठलंही वाद्य शिका ते वाजवा. गाणी ऐका आणि गा.

* बागकाम करा. पाळीव प्राण्यांशी खेळा.

* एखादा छान पदार्थ स्वतः साठी आणि इतरांसाठी बनवा. एकत्र त्या पदार्थांचा आस्वाद घ्या.

* एकटे बसू नका. जवळच्या लोकांशी गप्पा मारा. संवाद साधा.

* लहान मुलांशी बोला. त्यांच्याशी खेळा.

* ध्यानधारणा करता येईल.

करायच्या झाल्या तर अनेक गोष्टी आहेत ज्या करता येतील. आता त्या करायच्या की पुन्हा reel एके रील पाहत त्यात गुरफटून राहायचं, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT